शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर उपोषण सोडले; महापंचायतमध्ये घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 19:50 IST

शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून उपोषण संपवण्यात आल्याचे डल्लेवाल म्हणाले. काही दिवसापासून त्यांना शेतकऱ्यांनी उपोषण सोडण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांच्या एमएसपी आणि इतर मागण्यांसाठी १३१ दिवसांपासून उपोषण करणारे संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर आज उपोषण थांबवले आहे. फतेहगढ साहिब येथील सरहिंद धान्य बाजारात शेतकऱ्यांच्या महापंचायतीत त्यांनी ही घोषणा केली आणि पाणी घेतले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून उपोषण संपवण्यात आल्याचे डल्लेवाल यांनी जाहीर केले. 

गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबर २०२४ पासून उपोषण सुरू केले होते. काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते.

'इंग्रजीत स्वाक्षरी करता, तेव्हा कुठे जातो भाषेचा अभिमान?', पीएम मोदींचा सीएम स्टॅलिनवर निशाणा

४ मे रोजी चंदीगडमध्ये शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री चौहान  यांनी सांगितले होते. यापूर्वी, पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवले होते की डल्लेवाल यांनी त्यांचे उपोषण सोडले आहे, शेतकरी संघटनांनी सरकारचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले होते.

जगजीत सिंग यांनी श्री फतेहगड साहिब येथील शेतकऱ्यांच्या महापंचायतीलाही संबोधित केले. त्यांनी सांगितले की एम.एस.पी. आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत त्यांचा लढा सुरूच राहील. डल्लेवाल म्हणाले की, सरकारने आमच्यावर मोठा हल्ला केला आहे. चळवळ सुरू आहे, सुरू राहील आणि शेवटपर्यंत सुरू राहील. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असंही डल्लेवाल म्हणाले.

डल्लेवाल म्हणाले की, पंजाब सरकारने केंद्र सरकारसमोर झुकले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केवळ शेतकऱ्यांवर हल्ला केला नाही तर संपूर्ण पंजाबच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. या सरकारला मुलींचा, मातांचा किंवा मोठ्यांचा आदर करण्याची जाणीव नाही. आंदोलन सुरूच आहे. पुढे काय होईल हे मला माहित नाही. शेतकऱ्यांनी अपील केले होते, म्हणून मी उपोषण सोडत आहे, असंही डल्लेवाल म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाब