शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

मोठा खुलासा! २०० कोटींच्या वसुलीचा आरोप असणाऱ्यानं जॅकलीन फर्नांडिसला केलं होतं टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 22:23 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश आणि त्याची कथित पत्नी लीना पॉलने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबत आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालं आहे

ठळक मुद्देईडीने(ED) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचा जबाब नोंदवण्यासाठी तिला बोलावलं होतं.जॅकलीनशिवाय आणखी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता फिल्ममेकर यालाही सुकेश टार्गेट करणार होता.जॅकलीनने ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात अनेक महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे.

नवी दिल्ली -  बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोमवारी दिल्लीत ईडीच्या कार्यालयात तिची चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी कित्येक तास जॅकलीनची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर यांच्याशी जोडलेले आहे. सुकेशवर याआधीच मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. त्याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला चौकशीसाठी बोलावलं होतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश आणि त्याची कथित पत्नी लीना पॉलने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबत आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. ज्यामुळे ईडीने(ED) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचा जबाब नोंदवण्यासाठी तिला बोलावलं होतं. जॅकलीन लीना पॉलच्या जाळ्यात अडकली होती. लीना पॉलच्या माध्यमातून सुकेशने जॅकलीन फर्नांडिसला फसवणुकीचं टार्गेट केले होते.

आणखी एक बॉलिवूड कलाकार टार्गेटवर होता

सूत्रांच्या माहितीनुसार, जॅकलीनशिवाय आणखी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता फिल्ममेकर यालाही सुकेश टार्गेट करणार होता. ज्याचा खुलासा विशेष पथकाच्या चौकशीत झाला. परंतु एजेन्सीनं त्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा केला नाही. सुरक्षा कारणास्तव हे नाव सार्वजनिक करणं योग्य नाही असं सांगितले आहे. माहितीनुसार जॅकलीनने ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात अनेक महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे.

२०० कोटींच्या खंडणीत जेलमध्ये अडकलाय सुकेश

सुकेश चंद्रशेखर हा तिहाड जेलमध्ये बंद आहे. त्याच्यावर जेलमधूनच २०० कोटीची खंडणी वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अलीकडेच ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री लीना पॉल यांच्या चेन्नई येथील बंगल्यावर धाड टाकली होती. या छापेमारीत ईडीला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि १५ लग्झरी गाड्या मिळाल्या होत्या. तर तेथील बंगल्याची किंमत कोट्यवधी होती.

याआधी, पोलीस सूत्रांनी सांगितले होते की, हाय प्रोफाईल चीटर सुकेश तुरुंगातून एका मोठ्या व्यावसायिकाच्या संपर्कात होता आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात प्रकरण मिटवण्याचा दावा करून फोन करून पैसे उकळत होता. कारागृहात मोबाईल सापडल्यानंतर जेल प्रशासनाशी संबंधित काही अधिकारी रडारवर आले होते. सुकेश तीच व्यक्ती आहे, ज्याने AIADMK चे उपप्रमुख टीटीव्ही दिनाकरन यांच्याकडून 2 कोटी रुपये घेऊन निवडणूक चिन्ह मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. प्रकरण उघडकीस आल्यावर गुन्हे शाखेने सुकेशला अटक केली आणि सुकेशच्या माहितीवरून टीटीव्ही दिनाकरनलाही अटक करण्यात आली.

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय