शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फणस डोक्यात पडल्यामुळे 'तो' जखमी झाला अन् वैद्यकीय तपासणीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 08:36 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कासारगोड येथील एक व्यक्ती झाडावरून फणस काढत होता. त्यावेळी एक फणस त्याच्या डोक्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि पाठीला मार लागला.

ठळक मुद्देकेरळमध्ये आतापर्यंत ७९५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १ लाख ३० हजारांच्या पुढे गेला आहे.

कासारगोड : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन दिवसात देशात दररोज सहा हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बहुतेक लोकांना कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाली आहे. यातच केरळमधील कासारगोड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या डोक्यावर फणस पडल्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय तपासणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कासारगोड येथील एक व्यक्ती झाडावरून फणस काढत होता. त्यावेळी एक फणस त्याच्या डोक्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि पाठीला मार लागला. तसेच, या घटनेमुळे त्याचे हात व पाय देखील व्यवस्थित काम करीत नव्हते. त्यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणीनंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ऑटो चालक असल्याचे सांगण्यात येते. 

डॉक्टरांनी सांगितले की, "रुग्णालयात एक नियम तयार करण्यात आला आहे. यामध्ये ज्यावेळी शस्त्रक्रियेची आपत्कालीन केस येते. त्यावेळी संबंधित व्यक्तीची कोरोना तपासणी केली जाते. या तपासणीत सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला."

या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. मात्र, त्याच्या तेथील प्रवासाचा कोणताही इतिहास नव्हता. किंवा तो कोणत्याही कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात नव्हता. परंतु, ऑटो चालविण्याच्यावेळी तो एखाद्या  कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांतील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, केरळमध्ये आतापर्यंत ७९५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर, देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १ लाख ३० हजारांच्या पुढे गेला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ