शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

आईने ४ मुलांना वाढवले, आता ती म्हणतात, आईला का सांभाळू?; कोर्टाने फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 09:48 IST

मुलगा म्हणाला, आईने माझ्यासाठी काय केले?, कोर्ट म्हणाले, आई-वडिलांचा सांभाळ करणे मुलाचे कर्तव्य

 जबलपूर - आईने दिवस-रात्र काबाडकष्ट करून चार मुलांना मोठे केले, परंतु आता चारही मुले उतारवयात आईची काळजी घेऊ शकत नाहीत. जबलपूरच्या नरसिंगपूरमधील एका आईची ही कहानी आहे. तिच्या एका मुलाने सांभाळ करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आईने मला कोणतीही मालमत्ता दिलेली नाही, त्यामुळे मी तीचा सांभाळ करू शकत नाही, असे त्याने याचिकेत म्हटले आहे. त्यावर कोर्टाने मुलाला खडसावत आई-वडिलांनी मुलांना किती संपत्ती दिली त्यावर भरणपोषण भत्ता द्यावा हे ठरत नाही. पालकांना आधार देणे हे मुलांचे कर्तव्य आहे, असे कोर्टाने सांगितले. हा महत्त्वपूर्ण निर्णय याचिकेच्या सुनावणीत न्यायमूर्ती जीएस अहलुवालिया यांच्या एकल खंडपीठाने दिला.

प्रत्येक मुलाला द्यावे लागणार प्रत्येकी दोन हजारन्यायालयाने म्हटले आहे की, जर याचिकाकर्ता जमिनीच्या कमी जास्त वाटपामुळे नाराज असेल, तर दिवाणी खटला दाखल करण्याचा उपाय आहे, पण त्याला देखभालीच्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. यासोबतच एसडीएम कोर्ट ट्रिब्युनलचा आदेश आणि एडीएमचा सुधारित आदेश कायम ठेवत आईला आठ हजार रुपये म्हणजेच चार मुलांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे.

८ हजार जास्त नाहीत; याचिका फेटाळली  उच्च न्यायालयाने राहणीमानाचा वाढता खर्च आणि महागाई लक्षात घेऊन आठ हजार रुपये देखभाल भत्ता योग्य ठरवला. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची किंमत लक्षात घेता, ४ मुलांकडून दिले जाणारे ८ हजार रुपये भत्ता हा काही जास्त आहे असे म्हणता येणार नाही, असे म्हणत न्यायालयाने मुलाची याचिका फेटाळून लावली.

आई म्हणाली, मुलांनी आशा तोडलीमुलाच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान आईनेही उच्च न्यायालयात मुलाच्या विरोधात अर्ज दाखल केला. त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे जी काही खरेदी केलेली जमीन होती, ती मुलांनी सांभाळ करण्याच्या आश्वासनावर मुलांमध्ये वाटण्यात आली होती. मात्र चारही मुलांनी सांभाळण्यास नकार दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय