शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या आठवणीत १२ वर्षांची मुलगी एकटी गेली काशीला, फादर्स डेला घ्यायचं होतं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 11:21 IST

मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी सर्वत्र मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील १२ वर्षांची मुलगी बाबा विश्वनाथ य़ांच्या दर्शनासाठी एकटीच काशीला पोहोचली. घरातून १५ हजार रुपये घेऊन मुलगी बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनासाठी पोहोचली होती. मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी सर्वत्र मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 

मुलीने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या दिवंगत वडिलांची आठवण येत असल्याने ती बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनासाठी एकटीच गेली होती. मात्र इकडे जबलपूरमध्ये कुटुंबाचं टेन्शन वाढलं. जबलपूरच्या माधोताल पोलीस ठाण्यांतर्गत आयटीआयमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील १२ वर्षीय मुलगी अनुष्का हिला वाराणसीतील बाबा विश्वनाथांचं दर्शन घेण्याची इतकी इच्छा होती की ती रविवारी घरातून एकटीच निघून गेली.

कुटुंबीयांना अनुष्का घरी न दिसल्याने ते चिंतेत पडले आणि त्यांनी माधोतल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी सोशल मीडियावरही व्हायरल झाली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तत्काळ तपास सुरू केला. बसस्थानक, विमानतळ, रेल्वे स्थानकावर तपास सुरू करण्यात आला. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती जीआरपीच्या माध्यमातून आसपासच्या जिल्ह्यांनाही देण्यात आली. 

सोमवारी (१७ जून) संध्याकाळी वाराणसी रेल्वे स्थानकावर मुलगी सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस सूत्रांनी सांगितलं की, मुलीची चौकशी केली असता असं समोर आलं की, तिने तिच्या कुटुंबीयांना काशीला जाऊन बाबा विश्वनाथाचं दर्शन घेण्याबाबत अनेकदा सांगितलं होतं, परंतु तिच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला काशीला जाऊन आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ बाबा विश्वनाथांचे दर्शन घ्यायचं होतं. 

अखेर रविवारी अनुष्काने एकटीने वाराणसीला जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी ती रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि बनारसला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. अनुष्काच्या वडिलांचं दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. बाबा विश्वनाथांच्या दर्शनासाठी गेल्या दोन वर्षांपासून ती सतत बोलत होती. त्यामुळे फादर्स डेच्या दिवशी वडिलांची आठवण काढत अनुष्काने बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. १५ हजार रुपये घेऊन ती वाराणसीला गेली आणि तिथे बाबा विश्वनाथांचं दर्शन घेतल्यावर तिला समाधान मिळालं. 

टॅग्स :VaranasiवाराणसीFather's Dayजागतिक पितृदिन