शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
4
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
5
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
6
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
7
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
8
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
9
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
10
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
11
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
12
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
13
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
14
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
15
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
16
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
17
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
18
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
19
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
20
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?

...म्हणून पेट्रोल, डिझेल जीएसटी अंतर्गत आणलं जात नाहीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 15:46 IST

इंधन जीएसटी अंतर्गत आणायचं झाल्यास मोदी सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल

मुंबई: पेट्रोल, डिझेलचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधी 19 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले नव्हते. मात्र कर्नाटकमध्ये मतदान होताच इंधनाचे दर पुन्हा वाढू लागले. सोमवारी मुंबईत पेट्रोलचा दर 84.40 रुपये प्रति लिटर होता. याशिवाय डिझेलचा दरही 74 रुपयांवर जाऊन पोहोचला. इंधन दराचा भडका उडाल्यानं सामान्य जनता चांगलीच हैराण झाली आहे. पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. मात्र हे पाऊल उचलणं सरकारसाठी तितकंसं सोपं नाही. दरांमध्ये वाढपेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या अंतर्गत आल्यास काही राज्यांमध्ये इंधनाचे दर घटतील. मात्र ज्या राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर कमी आहेत, तिथे दरवाढ होईल. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात इंधनावर 40 टक्के व्हॅट लागतो. मात्र अंदमान आणि निकोबारसारख्या काही राज्यांमध्ये 6 टक्के व्हॅट लावण्यात येतो. एका करानं अडचणी वाढणारपेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये केला गेल्यास देशभरात एकच कर लागेल. यामुळे महाराष्ट्रासह अनेक भागांमधील लोकांना दिलासा मिळेल. मात्र कमी व्हॅट आकारणाऱ्या भागातील लोकांना दरवाढीचा सामना करावा लागेल. कारण जीएसटीमुळे या भागातील पेट्रोल, डिझेलचे दर वाढतील. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष अशाप्रकारे जनक्षोभ ओढावून घेणार नाही. राज्यांमध्ये एकमत होणं अवघडपेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्यास केंद्रासह राज्यांच्या महसुलावरही परिणाम होऊ शकतो. इंधनावर लावल्या जाणाऱ्या व्हॅटमधून सरकारला मोठं उत्पन्न मिळतं. राजकीय लाभासाठी पेट्रोल आणि डिझेलवर कमी व्हॅट आकारणारी राज्यं जीएसटीबद्दल फारशी अनुकूल नसतील. कारण पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटी अंतर्गत झाल्यास या राज्यांमधील इंधन दर वाढतील. याचा फटका तेथील सत्ताधारी पक्षांना बसेल.   

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलGSTजीएसटी