शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

श्रीनगरमध्ये पुन्हा इसिसचे झेंडे

By admin | Updated: August 1, 2015 04:51 IST

श्रीनगरमध्ये शुक्रवारी काही युवकांनी पाकिस्तान आणि इसिसचे (इस्लामिक स्टेट्स आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरिया) झेंडे दाखवत पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे तणाव निर्माण झाला.

श्रीनगर : श्रीनगरमध्ये शुक्रवारी काही युवकांनी पाकिस्तान आणि इसिसचे (इस्लामिक स्टेट्स आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरिया) झेंडे दाखवत पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे तणाव निर्माण झाला. जम्मू-काश्मिरात अलीकडे इसिसचे आणि पाकिस्तानी झेंडे दाखविण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातून इसिस भारतात पाय रोवू पाहत असल्याचे भयसूचक संकेत मिळत असल्याने गुप्तचर तसेच सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. त्यात इसिसने दोन दिवसांपूर्वी लिबियात चार भारतीय शिक्षकांचे अपहरण केल्याची भर पडली आहे.जामिया मशिदीत नमाज अदा केल्यानंतर युवकांच्या एका गटाने स्वातंत्र्याचे नारे देत नौहट्टा चौकाकडे मार्च नेला तेव्हा सुरक्षा जवानांनी त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अलीकडेच मरण पावलेला तालिबानी अतिरेकी मुल्ला ओमर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील फासावर गेलेला आरोपी याकूब मेमन याच्यासाठी श्रीनगरमधील काश्मीर विद्यापीठ आणि अनंतनाग जिल्ह्यात मृत्यूनंतरची विशेष प्रार्थना करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ३१ जुलै रोजी लागोपाठ तिसऱ्या शुक्रवारी श्रीनगरच्या जामिया मशिदीजवळ इसिसचे झेंडे दाखविण्यात आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी हे झेंडे फडकाविणाऱ्या १२ युवकांची ओळख पटवली आहे. अर्थात यापूर्वीही असेच कृत्य करणाऱ्या युवकांचा माग काढण्यात आला होता.पण त्यांची ओळख पटल्यावरही त्यांना अटक करण्यापेक्षा त्यांच्यावर करडी नजर ठेवणेच काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी पसंत केले होते. या वेळीही तसेच धोरण सुरक्षा यंत्रणांनी स्वीकारले आहे. ओलिसांच्या निर्घृण हत्येची छायाचित्रे जारी करीत मध्य- पूर्वेत दहशत निर्माण करणारी इसिस जम्मू-काश्मिरात अजून सक्रिय नसली तरी तिचे समर्थन करण्याच्या घडामोडींनी सुरक्षा दलाची चिंता वाढवली आहे. (वृत्तसंस्था)