शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
2
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
3
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
4
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
5
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
6
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
7
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
8
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
9
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
10
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
11
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
12
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
13
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
14
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
15
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
16
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
17
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
18
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
19
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
20
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

"सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही, परंतु..."; केंद्रीय टीमबाबत म्हणाल्या ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 9:31 AM

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी झाला होता हिंसाचार.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी झाला होता हिंसाचार.ममता बॅनर्जींकडून भाजपला जनादेश स्वीकारण्याची विनंती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर टीम पाठवण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नुकतेच पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला २१३ जागांवर विजय मिळाला. यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस आमने-सामने आले आहेत. "माझी शपथ घेऊन २४ तासही झाले नाहीत आणि मला पत्रही येऊ लागली आहेत. एक केंद्रीय टीम पोहोचली आहे. असं यासाठी आहे कारण या ठिकाणी जनतेनं भाजपला स्वीकार केलं नाही," असं ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. "जनादेशाचा स्वीकार करण्याचं मी आवाहन करते. आपल्याला कोरोनाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे," असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना नीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे. "केंद्राकडे कोरोनासंदर्भात कुठल्याही प्रकारची पारदर्शक नीती नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. यात अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे," असे ममता म्हणाल्या. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करत अद्याप राज्याला पुरेशा लशी मिळालेल्या नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. (CM Mamta banerjee says corona Virus increased in bengal due to repeated visits of bjp leaders) "ममता म्हणाल्या भाजप नेते राज्यात फिरत आहेत. येथील जनतेला भडकावत आहेत. नव्या सरकारला अद्याप २४ तासही झालेले नाहीत आणि ते पत्र पाठवत आहेत. टीम आणि नेते येत आहेत. ते खरोखरच जनादेश स्वीकारायला तयार नाहीत. मी त्यांना लोकांचा जनदेश स्वीकारण्याची विनंती करते," असंही त्या म्हणाल्या. "मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी अद्याप आपल्याला कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेलं नाही. ते २० हजार कोटी रुपये खर्च करून नवी संसद आणि पुतळे तयार करत आहेत. मात्र, लसीसाठी ३० हजार कोटी रुपयांची व्यवस्था करू शकत नाहीत," असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा