शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आयटीसी, उपकंपन्यांकडून काँग्रेसला गेल्या वर्षी २० कोटी रुपयांची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:47 IST

Congress News : १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत काँग्रेसला आयटीसी व तिच्या उपकंपन्यांकडून २० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. 

नवी दिल्ली : १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत काँग्रेसला आयटीसी व तिच्या उपकंपन्यांकडून २० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. काँग्रेस पक्षाला मोठी देणगी देणाऱ्या नामांकित कंपन्यांमध्ये आयटीसीचा समावेश झाला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात मिळालेल्या देणग्यांचा तपशील काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केला होता.भाजप, तृणमूल काँग्रेस, भाकप, माकप आदी पक्षांना गेल्या वर्षी मिळालेल्या देणग्यांचे अहवाल निवडणूक आयोगाने जनतेसाठी अद्याप खुले केलेले नाहीत. २०१९-२० या वित्तीय वर्षात बसपला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची एकही देणगी मिळालेली नाही व राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण ६० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या.काँग्रेस पक्षाला आयटीसीकडून सुमारे १३ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. आयटीसीच्या उपकंपन्या असलेल्या आयटीसी इन्फोटेक, रसेल क्रेडिट लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे ४ कोटी व १.४ कोटी रुपयांची देणगी काँग्रेस पक्षाला दिली आहे. 

देणग्या कोणी दिल्या?विविध कंपन्यांच्या निवडणूक ट्रस्टनी काँग्रेस पक्षाला मोठ्या देणग्या दिल्या आहेत. भारती एअरटेल ग्रुप, डीएलएफचे पाठबळ असलेल्या प्रुडंट इलेक्ट्रोरल ट्रस्ट व जनकल्याण इलेक्ट्रोरल ट्रस्टने काँग्रेस पक्षाला अनुक्रमे ३० कोटी व २५ कोटी रुपयांच्या देणग्या मागील वित्तीय वर्षात दिल्या आहेत. 

देणग्यांची सविस्तर नोंदराजकीय पक्षांना २० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मिळालेल्या देणग्यांचीच नोंद त्यांच्या अहवालात केली जाते. अशा पद्धतीने काँग्रेसने गेल्या वर्षी मिळालेल्या १३९ कोटी रुपयांच्या देणग्यांची नोंद यासंदर्भातील अहवालात केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण