शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत लावलं जातं लग्न; काय आहे 'करेवा विवाह'?, दिल्ली हायकोर्टासमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:40 IST

भारतात लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आणि कोर्ट मॅरेजप्रमाणेच करेवा विवाह हा लग्नाचा भाग आहे परंतु हा इतर प्रथेपेक्षा वेगळा आहे

नवी दिल्ली - नुकतेच दिल्ली हायकोर्टात एक प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे ते म्हणजे करेवा विवाह...करेवा विवाहातून जन्माला आलेल्या मुलाला कायदेशीर अधिकार मिळावा की नाही यावर तपास करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिलेत. या विवाहातून जन्मलेल्या मुलांना तेच अधिकार मिळायला हवेत जे अन्य वैध विवाहातून जन्मलेल्या मुलांना मिळतात यावर कोर्ट विचार करत आहे. परंतु करेवा विवाह नेमका काय असतो, ज्यातून दिल्ली हायकोर्टासमोर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे हे जाणून घेऊया..

काय असतो करेवा विवाह?

उत्तर भारतात विशेषत: हरियाणा, पंजाब येथे अशी परंपरा आजही समाजात पाहायला मिळते. ही परंपरा आहे करेवा विवाह..यादव समुदायात ही परंपरा पाहायला मिळते. या प्रथेत दीर भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीसोबत लग्न करतो. ही परंपरा राजस्थान, उत्तर प्रदेशातील काही भागात दिसून येते. त्याचा हेतू कुटुंब एकजूट ठेवणे, कौटुंबिक संपत्ती विखुरण्यापासून वाचवणे, विधवा महिलेला आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देणे हे आहे.

भारतात लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आणि कोर्ट मॅरेजप्रमाणेच करेवा विवाह हा लग्नाचा भाग आहे परंतु हा इतर प्रथेपेक्षा वेगळा आहे. त्यात नवरा आणि नवरी वेगवेगळ्या कुटुंबातील नव्हे तर एकाच कुटुंबाचा भाग असतात. जुन्या काळात विधवा महिलांना समाजात जगताना अनेक अडचणी यायच्या. त्यात करेवा विवाह ना केवळ त्यांना सुरक्षा द्यायचे तर समाजात सन्मानही दिला जायचा. करेवा विवाहात जमीन आणि घर कुटुंबातच राहते. बऱ्याचदा हे लग्न विधवा महिलेच्या मर्जीविरोधात केले जाते. त्यामुळे महिलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत प्रश्न निर्माण होतो. 

हिंदू विवाह अधिनियमात 'करेवा'बाबत स्पष्ट उल्लेख नाही

करेवा विवाह ना सामान्य लग्नासारखे आहे ना आधुनिक लग्नप्रणालीत त्याचा उल्लेख होतो. ही प्रथा केवळ समाजाच्या काही मान्यतांवर टिकून आहे परंतु यातून जन्मलेल्या मुलांच्या अधिकारावरून कायदेशीर पेच निर्माण होतात. हिंदू विवाह अधिनियम १९५५ मध्येही यावर स्पष्ट उल्लेख नाही. परंतु पंजाब आणि हरियाणासारख्या राज्यात या विवाह प्रथेला मान्यता देण्यात आली आहे.  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmarriageलग्न