उत्तर प्रदेशमधून अनेक फुसणुकीच्या घटना समोर येतात. आता उत्तर प्रदेश एसटीएफच्या नोएडा युनिटने गाझियाबादमध्ये कार्यरत असलेल्या बेकायदेशीर दूतावासाचा पर्दाफाश केला आहे. एसटीएफने जेडी जैन यांचा मुलगा हर्षवर्धन जैन याला अटक केली आहे. तो गाझियाबादमधील कविनगर येथील रहिवासी आहे. बेकायदेशीर आणि बनावट दूतावासातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेली वाहने जप्त केली आहेत.
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन केबी ३५ कविनगर येथे घर भाड्याने घेऊन बेकायदेशीरपणे वेस्ट आर्क्टिक दूतावास चालवत होता. तो स्वतःला वेस्ट आर्क्टिका, सबोर्गा, पौलविया, लोडोनिया या देशांचा कॉन्सुलर/राजदूत म्हणवून घेत असे. लोकांना फसवण्यासाठी त्याने डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेल्या अनेक गाड्यांची व्यवस्था केली होती, या सर्व गाड्या बनावट होत्या.
त्याच्याविरोधात दलाली आणि हवालाचाही आरोप
लोकांना आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी त्याने अनेक युक्त्या लढवल्या होत्या. त्याने पंतप्रधान आणि राष्ट्रपती आणि इतर अनेक मान्यवरांसोबतचे त्याचे मॉर्फ केलेले फोटो लोकांना दाखवत होता. त्याचे मुख्य परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली दलाल करणे आणि शेल कंपन्यांद्वारे हवाला रॅकेट चालवणे आहे.
हर्षवर्धन यापूर्वी चंद्रास्वामी आणि अदनान खगोशी यांच्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. २०११ मध्ये हर्षवर्धनकडून एक बेकायदेशीर सॅटेलाईट फोन देखील जप्त करण्यात आला होता. यासंदर्भात कविनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी कविनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी चौकशी सुरू आहे.
गाडी, पैसे जप्त
राजनैतिक नंबर प्लेट असलेली चार वाहने, लहान देशांचे २-१२ राजनैतिक पासपोर्ट, परराष्ट्र मंत्रालयाचा शिक्का असलेले बनावट कागदपत्रे, दोन बनावट पॅन कार्ड, वेगवेगळ्या देशांचे आणि कंपन्यांचे ५-३४ स्टॅम्प, ६-२ बनावट प्रेस कार्ड, ४४,७०००० रुपये रोख, अनेक देशांचे परकीय चलन,अनेक कंपन्यांचे कागदपत्रे हे सर्व त्याच्या ऑफिसमधून ताब्यात घेतले आहेत.