शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:41 IST

'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली.'

Nirmala Sitharaman Slams Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान भाजपवर जोरदार टीका केली. यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल यांचे दावे फेटाळून लावत UPA सरकारच्या काळात काहीही कामे झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

यूपीए सरकारच्या काळात देशाचे नुकसानआजतकशी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली. यूपीए सरकारने दहा वर्षांत देशाचे जेवढे नुकसान केले, ते साफ करायलाच आम्हाला चार-पाच वर्षे लागली. राहुल गांधींना बँका आणि व्यवसायांच्या खराब स्थितीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.' 

बँकांचे नुकसान आम्ही भरून काढत आहोत!'यूपीएच्या दहा वर्षांच्या काळात उद्योगपतींनी नोकऱ्यांना टाळे ठोकले होते. त्यांच्या कार्यकाळात बँकांचे खूप नुकसान झाले आणि बँकांमुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेचेही नुकसान झाले. ज्यांना बँकेचे फायदे मिळाले, ते देश सोडून गेले. त्यांच्या काळात पैसे घेऊन पळून गेलेल्यांची मालमत्ता आम्ही जप्त केली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर आज 18-22 हजार कोटी रुपये परत दिले जात आहेत. त्यामुळेच राहुल गांधींना बोलण्याचा अधिकार नाही,' असा हल्लाबोल निर्मला सीतारामन यांनी केला.

चीनने भारताची जमीन बळकावली?मेक इन इंडिया उपक्रम अपयशी ठरला, त्यामुळेच चीनने भारतीय भूमीवर कब्जा केला, या राहुल गांधींच्या दाव्यावर सीतारामन म्हणाल्या, 'त्यांच्या आजोबांच्या काळात चीन आणि पाकिस्तानने लडाखमध्ये किती भूभाग बळकावला होता? सामंजस्य करार करताना तुम्ही चीनला आपली जमीन परत करण्यास सांगितले होते का?' असा सवालही निर्मला सीतारामन यांनी विचारला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा