पाच तास लागले मृतदेह बाहेर काढायला
By admin | Updated: May 8, 2016 23:08 IST
शनिवारी रात्री परत आल्यानंतर तालुका पोलिसांनी रविवारी सकाळी सात वाजता पुन्हा घटनास्थळ गाठले. विहिरी दोनशे फुट खोल व धोकादायक असल्याने उतरणे व चढणे अवघड होत होते. भील समाजाच्या काही तरुणांना बोलावून त्यांना विहिरीत उतरविण्यात आले. मृतदेह अतिशय कुजलेला व दुर्गंधी येत असल्याने तेथे थांबणेही अवघड जात होते. झोका मागवून पाच तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर दुपारी बारा वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी धर्मा भावडू भील (वय २२ रा.अट्रावल ता.यावल) याच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.