शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

बापरे! आमदाराच्या ड्रायव्हरकडे सापडलं 1 कोटींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 12:18 IST

IT Raid 1 Crore Seized : आमदाराच्या ड्रायव्हरकडे भली मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - आयकर विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अण्णाद्रमुकचे  (AIADMK) आमदार आर. चंद्रशेखर यांच्या ड्रायव्हरच्या घरावर छापा टाकला आहे. या छापेमारीत तब्बल 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. आर. चंद्रशेखर या आमदाराच्या ड्रायव्हरकडे भली मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अलगरासामी असं या चालकाचं नाव असून त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदार संघाचे चंद्रशेखर हे आमदार आहेत.

गेल्या 9 ते 10 वर्षांपासून अलगरासामी आर. चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करतात. आता तिसऱ्यांदा त्यांची AIADMK चा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर यांच्या अन्य दोन साथीदारांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे. कोविलपट्टी गावातील थंगापंडी आणि मुरुगनंदम या दोघांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत तब्बल 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. 500 रुपयांच्या नोटांचे बंडलच्या बंडल सापडले आहेत. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांच्या घराजवळ असणाऱ्या निवासस्थानाजवळ रविवारी रात्री आयकर विभागाने ही छापेमारी केली होती. कोणतेही कागदपत्र किंवा आवश्यक माहितीशिवाय ठेवण्यात आलेले 1 कोटी रुपये यावेळी जप्त करण्यात आले. निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आल्यानंतर तामिळनाडुच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त केली जात आहे. आयकर विभागाने याआधी देखील कारवाई केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१TamilnaduतामिळनाडूIncome Taxइन्कम टॅक्सMONEYपैसा