शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अभिनेता, कुलगुरू तथा मंत्र्यावर आयटीचे छापे

By admin | Updated: April 8, 2017 00:19 IST

एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गीतालक्ष्मी यांच्यासह इतरांवर एकाचवेळी धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे.

चेन्नई : करचुकवेगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी तामिळनाडूनचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर, अभिनेता शरदकुमार, माजी खासदार सी. राजेंद्रन आणि एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गीतालक्ष्मी यांच्यासह इतरांवर एकाचवेळी धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. आर.के. नगर विधानसभा मतदारसंघात १२ एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या आधीच चेन्नई, पुडुक्कोट्टई आणि तिरुचिराप्पली आणि नमक्कलसह एकूण ३० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.शंभर अधिकाऱ्यांसह पोलीस व निमलष्कर दलाचे सुरक्षा जवान या धाडसत्रात सहभागी असून, राज्यातील वैद्यकीय विद्यापीठ, वैद्यकीय व्यावसायिक आणि औषधी कंपन्या व या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर धाडसत्र चालू आहे. एका आमदारावरही धाड टाकण्यात आली आहे. आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरला जात असल्याचा सुगावा लागल्याने आणि सत्ताधारी अम्मा गटाच्या अद्रमुक गटातर्फे धनाच्या राशी ओतल्या जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत प्राप्तिकर अधिकाऱ्याने हे धाडसत्र हाती घेतले आहे, असे सूत्रांनी सांगितले. ही पोटनिवडणूक अद्रमुकच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची केलीआहे. अद्रमुक अम्मा गटाने टी.टी.व्ही. दिनकरन यांना मैदानात उतरविले आहे. (वृत्तसंस्था)>भाजपवर टीकाआम्हाला धाकदपटशा दाखविण्यासाठी भाजपाच्या इशाऱ्याबरहुकूम आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांच्यावर धाड टाकण्यात आल्याचा आरोप अद्रमुक अम्मा गटाने केला आहे. प्राप्तिकर विभाग आमची वाट्टेल तेथे झाडाझडती घेत आहे. माझ्या स्नानगृहाचीही त्यांनी झडती घेतली; परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नाही. माझ्या मुलांना शाळेतही जाऊ दिले नाही, असा आरोप सी. विजयभास्कर यांनी केला आहे.ही तर धमकावणीचअद्रमुक अम्मा गटाला धमकावत आमच्याबद्दल लोकांत भीती निर्माण करण्याच्या उद्देशानेच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच यामागे आहे, असा आरोप खासदार एस.आर. बालासुब्रमणियन यांनी केला आहे. सम्मुथुवा मक्कल कची पक्षाचे नेते व अभिनेता शरथकुमार यांच्या घरातून लाखो रुपये जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी या पोटनिवडणुकीत दिनकरन यांना पाठिंबा दिलेला आहे.