शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

मतदारांशी संपर्क साधून यशस्वी अंदाज वर्तवणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 06:14 IST

देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवण्यात भलेभले दिग्गज अपयशी ठरले असताना ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने वर्तवलेला अंदाज अचूक ठरला आहे.

- खलील गिरकर देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवण्यात भलेभले दिग्गज अपयशी ठरले असताना ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने वर्तवलेला अंदाज अचूक ठरला आहे. याबाबत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : लोकसभा निकालाबाबत अनेकांचे अंदाज पूर्णत: चुकत असताना तुमच्या संस्थेने वर्तवलेला अंदाज बरोबर कसा आला, यामागे काय वेगळे तंत्र आहेउत्तर : आमच्या संस्थेला निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवण्याचा चांगला अनुभव आहे. आम्ही २०१३ पासून विविध ३६ निवडणुकांचे निकाल वर्तवले असून ते ३४ वेळा योग्य ठरले आहेत. आमची कामाची पद्धत इतरांपेक्षा काहीशी वेगळी आहे. आम्ही अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करत आलो आहोत. त्यामुळे आमचे अंदाज तंतोतंत बरोबर येतात.प्रश्न : लोकसभा निवडणूक निकालाचे भाकीत वर्तवण्यासाठी काय परिश्रम घेतले होते?उत्तर : आम्ही आमच्या सहकाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले होते. आमच्या सहकाऱ्यांनी देशातील लोकसभा मतदारसंघात जाऊन विविध वयोगटातील व विविध जातीय, राजकीय, सामाजिक, आर्थिक गटाच्या नागरिकांसोबत संवाद साधला आहे. देशभरात ७ लाख ४२ हजार १८७ जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आमच्या ५४२ सदस्यांच्या टीमने यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. आम्ही केवळ मतदानोत्तर अंदाज वर्तवले होते. १२ एप्रिल ते १९ मे यादरम्यान आमची टीम देशभरात कार्यरत होती. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची आपली वेगळी ओळख असते. त्यांचे वेगळे वैशिष्ट्य असते. त्याचा अभ्यास करून आमचे सहकारी काम करतात. सर्वप्रथम आम्ही तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचतो. त्यांच्याशी संवाद साधतो व त्यांच्या भावना जाणून घेतो. त्यानंतर प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांची मुलाखत घेतो. प्रत्येक मतदारसंघात सरासरी १३७० जणांशी आम्ही संवाद साधला.‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने एनडीएला ३३९ ते ३६५ जागा व यूपीएला ७७ ते १०८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता.>अचूक अंदाज‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व बहुजन समाजवादी पक्षाच्या आघाडीला १० ते १६ जागा मिळण्याचे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात या राज्यात सप-बसप आघाडीला १५ जागा मिळाल्या आहेत. इतरांना ५९ ते ७९ जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. प्रत्यक्षातील निकालाने या भाकिताचे अचूकपण सिद्ध केले आहे.>१९९३ पासूनच्या संघर्षाला यशसन १९९३ मध्ये मध्य प्रदेशच्या एका गावातून मुंबईत आलेल्या गुप्ता यांनी इतरांप्रमाणे संघर्ष करत आपली मार्गक्रमणा ्रकरण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी ते दिल्लीत काही काळ काम करत होते. २०१३ पासून त्यांनी निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत ३६ निवडणुकांच्या निकालाचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ही ३७ वी वेळ होती. आतापर्यंत त्यांचे दोन वेळा अंदाज चुकले आहेत. इतर सर्व अंदाज बरोबर आले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी