शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या गुजराती भाविकांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 09:13 IST

गतवर्षी अमरनाथ यात्रेला गेलेल्या गुजराती भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या गुजराती भाविकांसाठी यात्रेदरम्यान बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक करण्याचा निर्णय...

बडोदा - गतवर्षी अमरनाथ यात्रेला गेलेल्या गुजराती भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या गुजराती भाविकांसाठी यात्रेदरम्यान बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. जे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून यात्रेस जातात त्यांच्यासाठी बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे अनिवार्य असेल.  मात्र विमान आणि रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना हा नियम लागू करण्यात आलेला नाही. गुजरातमधून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला जात असतात. या यात्रेसाठी गुजरातमधून सुमारे पाच ते सात हजार भाविक नोंदणी करून जात असतात. तर सुमारे 35 हजारांहून अधिक भाविक नोंदणी न करताच यात्रेला जातात. सध्या खाजगी टूर ऑपरेटर्सकडून अमरनाथ दहा हजार रुपये आकारण्यात येतात. मात्र बुलेटप्रुफ जॅकेटची किंमत 12 हजारांहून अधिक असल्याने यात्रेकरूंना अधिकचा भूर्दंड पडणार आहे.  दरम्यान, राज्य सरकारने केलेल्या या नियमाबाबत खासगी टूर ऑपरेटर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने केलेल्या नियमावलीत टूर ऑपरेटर्सनी यात्रेकरूंना बुलेटप्रुफ जॅकेट उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच या नियमाची अंमलबजावणी केली नाही तर सदर टूर कंपनीला परवाना दिला जाणार नाही, अशीही तरतूद या नियमावलीत करण्यात आली आहे. तसेच अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा चालक हा 50 वर्षांहून अधिक वयाचा नसावा अशीही तरतूद या नियमावलीत करण्यात आली आहे. या नियमावलीवर टीकास्र सोडताना अखिल गुजरात टुरिस्ट व्हेईकल ऑपरेटर्स फेडरेशनचे चेअरमन हरी पटेल म्हणाले, "बुलेटप्रुफ जॅकेट खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नसतात. मग ते आम्ही खरेदी करायचे कसे? खाजगी टॅक्सी, ट्रेन आणि विमानातून प्रवास करणाऱ्यांना हा नियम लागू नाही. मात्र आम्ही या नियमाचे पालन करण्यास तयार आहोत. पण सरकारने त्यासाठी योग्य कारण दिले पाहिजे."  

टॅग्स :Gujaratगुजरातtourismपर्यटनJammu Kashmirजम्मू-काश्मीर