शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अडकविणे, लटकविणे हे आमचे काम नाही, माेदींचा विराेधकांना टाेला; पहिल्या हरित विमानतळाचे राष्ट्रार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 06:28 IST

२०१९ मध्ये मी या विमानतळाची पायाभरणी केली होती. तेव्हा ही निवडणूक खेळी असल्याचा दावा टीकाकारांनी केला होता.

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील नवीन डोनी पोलो या देशातील पहिल्या हरितक्षेत्र विमानतळाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आदिवासी पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला.  राज्याची राजधानी इटानगरपासून १५ किलोमीटरवरील हॉलोंगी येथे असलेले हे विमानतळ व्यावसायिक उड्डाणांद्वारे सीमावर्ती राज्याला इतर भारतीय शहरांशी तर हेलिकॉप्टर सेवेद्वारे राज्याच्या इतर भागांशी जोडेल. मोदी यांनी पश्चिम कामेंग जिल्ह्यातील ६००  मेगावॅटचा कामेंग जलविद्युत प्रकल्पही राष्ट्राला समर्पित केला. प्रकल्प ८० चौरस किमीपेक्षा जास्त क्षेत्रात ८४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. त्यातून अरुणाचलच्या गरजेहून अधिक वीज तयार हाेईल. 

आम्ही निवडणुकीसाठी नाही विकासासाठी काम करतो२०१९ मध्ये मी या विमानतळाची पायाभरणी केली होती. तेव्हा ही निवडणूक खेळी असल्याचा दावा टीकाकारांनी केला होता. आज निवडणूक नसताना आम्ही हे विमानतळ सुरू करत आहोत. ही त्यांच्यासाठी सणसणीत चपराक आहे. आधीच्या सरकारांना केवळ निवडणुका जिंकायच्या होत्या. आम्ही फक्त देशाच्या विकासासाठी काम करतो.    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

विमानतळावर ६४५ कोटींचा खर्चदेशाचे पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेशात विमानतळ नव्हते. सर्वात जवळची हवाई सुविधा लीलाबारी विमानतळ येथे आहे. तो आसामच्या उत्तर लखीमपूर जिल्ह्यात ८० किमी अंतरावर आहे. तथापि, पासीघाट व तेजूसह राज्यात काही प्रगत लँडिंग ग्राउंड आहेत.

‘लक्ष्मीबाई प्रेरणास्रोत’ nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. nत्यांनी दाखवलेले धैर्य व दिलेले अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही. वसाहतवादी राजवटीला त्यांनी केलेल्या दृढ विरोधामुळे त्या प्रेरणास्रोत आहेत,” असे मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा