शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे तर केंद्र सरकारचे कर्तव्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 09:50 IST

सुप्रीम कोर्ट; भरपाईबाबत सहा आठवड्यांत मार्गदर्शक तत्वे तयार करा

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर भरपाईबाबतच्या याचिकांची सुनावणी झाली

नवी दिल्ली : कोरोनाने मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांना भरपाई देण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारने सहा आठवड्यांच्या आत तयार करावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

न्यायालयाने सांगितले की, रुग्णांच्या वारसदारांना किमान किती भरपाई द्यावी याची रक्कम आम्ही निश्चित करणार नाही. ते काम सरकारने करायचे आहे. आपत्तीत लोकांना मदत देणे हे सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे असलेले कर्तव्य या संस्थेने पार पाडल्याचे दिसत नाही असेही न्यायालयाने सुनावले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर भरपाईबाबतच्या याचिकांची सुनावणी झाली. कोरोनामुळे किंवा कोरानातून बरे झाल्यानंतरही उद्भवलेल्या इतर विकारांमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये भरपाई द्यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना द्यावा अशी विनंती याबाबतच्या याचिकांमध्ये करण्यात आली होती. मात्र अशी भरपाई दिल्यास सरकारी तिजोरीवर मोठा ताण येईल. त्यामुळे असा निर्णय घेणे शक्य होणार नाही असे केंद्र सरकारने न्यायालयाला याआधीच सांगितले होते. 

आपत्तीचे नियम लागू करण्याची मागणीn कोरोना साथीला राष्ट्रीय आपत्तीबाबतचे सर्व नियम लागू करावेत व त्याप्रमाणे कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी अशी मागणी काही संस्थांनी केंद्राकडे केली होती. n पण त्यावर केंद्र सरकारने फारसा प्रतिसाद न दिल्याने या संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

पैसा अपुरा पडण्याची भीती  

n केंद्राने म्हटले आहे की, कोरोना बळींच्या वारसदारांना भरपाई दिल्यास कोरोना उपचारांसाठी व इतर अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीकरिता पैसा अपुरा पडेल. n आमच्याकडे असलेल्या संसाधनांना काही मर्यादा आहेत. धोरणात्मक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाला केली होती. 

यूएईमध्ये स्पुतनिक व्ही ९७% परिणामकारकसंयुक्त अरब अमिरातीत स्पुतनिक व्ही लस संसर्गावर ९७.८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा रशियन संस्थेने केला आहे. 

मागील ८७ दिवसांत सर्वात कमी मृत्यूंची नोंद 

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनामुळे ८१७ जण मरण पावले असून हा मागील ८७ दिवसांतला सर्वात कमी आकडा आहे. तसेच ४५ हजारांहून जास्त नवे रुग्ण सापडले असून ६० हजार लोक बरे झाले. सलग ४८व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण जास्त होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार