शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला राज्यसभेत यंदाही बहुमत गाठणे कठीण, पाच राज्ये गमावल्याने पुरेसे संख्याबळ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 04:36 IST

पाच वर्षे राज्यसभेतील बहुमताशिवाय सत्ता राबवाव्या लागलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) सन २०२० या नव्या वर्षांतही संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणाार नाही, अशी चिन्हे आहेत.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात संपूर्ण पाच वर्षे राज्यसभेतील बहुमताशिवाय सत्ता राबवाव्या लागलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) सन २०२० या नव्या वर्षांतही संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणाार नाही, अशी चिन्हे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्वीपेक्षाही अधिक बहुमताने दिल्लीत सत्तेत आलेल्या ‘रालोआ’ने आणि प्रामुख्याने त्यातील भाजप या सर्वात मोठ्या पक्षाने त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणकांमध्ये पाच राज्ये गमावणे हे याचे प्रमुख कारण आहे. विशेषत: महाराष्ट्र व हरियाणात आधीपेक्षा कमी आमदार निवडून आल्याने भाजपाचे राज्यसभेतील बहुमताचे गणित बिघडले आहे. राज्यसभेची निवडणूक राज्य विधानसभांमधून होत असते.राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांपैकी १० जागा उत्तर प्रदेशातील असतील. छत्तीसगढ, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातील सत्ता गमावल्याचा फटका भाजपाला तेथील राज्यसभा निवडणुकीत नक्कीच बसेल. हरियाणात भाजपाने सत्ता कायम राखली असली तरी त्यांच्या आमदारांची संख्या तेथे ४७ वरून ४० वर आली आहे. तीच स्थिती महाराष्ट्रात आहे. यावेळी त्यांचे विधानसभेत गेल्यावेळच्या १३९ पेक्षा १७ कमी म्हणजे १२२ आमदार निवडून आले आहेत.>आगामी वर्षात अनेक सदस्य होणार निवृत्तराज्यसभेच्या चार जागा आधीपासूनच रिक्त आहेत. त्यात आगामी वर्षात सदस्यांच्या निवृत्तीने आणखी ६९ जागांची भर पडणार आहे. निवृत्त होणाºया सदस्यांपैकी १० भाजपाचे तर १७ काँग्रेसचे आहेत. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत भाजपाचे सध्या ८३, काँग्रेसचे ४६ सदस्य आहेत. विविध राज्य विधानसभांमधील पक्षीय संख्याबळ पाहता रिक्त जागांसाठी होणाºया निवडणुकांनंतरही भाजपाची संख्या सध्यापेक्षा फार वाढेल असे दिसत नाही.