शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान कार्यालयातली ती १० मिनिटं कायम लक्षात राहणारी

By admin | Updated: April 17, 2017 19:39 IST

वातावरणात कमालीचा भारलेपणा. प्रशस्त हॉलवजा खोली. सजावट साधीच कुठलाही भपका नसलेली, तरीही रूबाबदार.

-अजय कौटिकवार

स्थळ : पंतप्रधान कार्यालय, संसद भवन, नवी दिल्ली.

वातावरणात कमालीचा भारलेपणा. प्रशस्त हॉलवजा खोली. सजावट साधीच कुठलाही भपका नसलेली, तरीही रूबाबदार. मध्यभागी प्रशस्त टेबल. टेबलाच्या एका बाजूला देशभरातली वृत्तपत्र शिस्तीत रांगेत लावलेली आणि बाजूला अशोक स्तंभाची प्रतिकृती. खोलीत आम्ही प्रवेश करताच, आईएङ्घ म्हणत त्यांनी आमचं स्वागत केलं. दोन तीन वाक्यात हिंदीत मी त्यांना ओळख सांगितली आणि येण्याचं प्रयोजन स्पष्ट केल. काय काय आहे पुस्तकात ? चांगल काम आहे. या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुध्द मराठीतल्या वाक्यानं आमचा तणाव पूर्णपणे निवळला आणि नंतरची जवळपास १० मीनिटं पंतप्रधानांसोबतचा हा मराठीतला संवाद चांगलाच रंगला...वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाजलेल्या निवडक भाषणाचं संकलन असलेलं सबका साथ सबका विकासहे पुस्तक मी आणि माझा सहकारी मित्र अमित मोडकनं तयार केलं. पुण्याच्या अमेय प्रकाशने अतिशय देखण्या रूपात हे पुस्तक प्रसिध्द केलं. यात पंतप्रधानांची दोन वर्षातली निवडक २८ भाषणं आणि १४ मन की बात चा मराठीमध्ये अनुवाद आहे. वर्षभरापासून आम्ही पुस्तक प्रकाशनासाठी पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र तो योग जुळून आला ११ एप्रिल २०१७ ला...संसदेतल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात दुपारी १२.१० ही भेटीची वेळ ठरली. सुरक्षेचे सर्व सोपस्कार पूर्ण करत मी अमित आणि आमचा आयबीएन-लोकमतचा दिल्लीतला प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर तासभर आधीच संसद भवन परिसरात दाखल झालो. ठिक १२ वाजता जेव्हा आम्ही वेटिंगरूममध्ये गेलो तेव्हा कुठं जीव भांड्यात पडला. श्री राजीव टोपनो हे करड्या शिस्तीचे अधिकारी तिथल्या संसद भवनातल्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रभारी. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या आणि बरोबर १२ वाजून १० मिनीटांनी आम्ही पंतप्रधानांच्या खोलीत प्रवेश केला. मोदींचा स्वभाव, कडक शिस्त आणि त्यांच्या स्वभावाचे किस्से अनेकांकडून ऐकले होते...त्यामुळं एक ताणही होता...पण त्यांची देहबोली आणि मराठीतल्या संवादानं वातावरण मोकळं झालं. पुस्तकाचा विषय निघाल्यावर ते आणखीच खुलले. लगेच खुर्चीवरून उठत, चला प्रकाशन करू असं म्हणत ते बाजूला मोकळ्या जागेत जावून उभे राहिले. सुरवातीला फोटो काढून झाल्यावर त्यांनी पुस्तक चाळत काही प्रश्नही विचारले... या पुस्तकातल्या महत्वाच्या प्रश्नांवर परिसंवाद/चर्चसत्र महाराष्ट्रात घडवून आणायला पाहिजे, असे बौध्दिक उपक्रम महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतात असं कौतुकही त्यांनी केलं. माझे गुरू लक्ष्मणराव इनामदार हे महाराष्ट्रातलेच होते अशी आठवणही सांगितली....बार, बार गलती करना पडता है !हा संवाद सुरू असतानाच ते पुस्तकावर स्वाक्षरीही देत होते. सही झाल्यावर तारिख टाकताना त्यांच्याकडून चुकून ११ ऐवजी १२ एप्रिल अशी तारिख लिहली गेली...त्यामुळं इतरही पुस्तकांवर त्यांनी १२ हीच तारिख टाकली आणि म्हणाले... एक बार गलती हुई तो बार बार गलती करना पडता है !ैै या त्यांच्या वाक्यानं आम्ही सगळेच हास्यकल्लोळात बुडालो.  मोदी हे गुड लिसनर आहेत असं ऐकलं होतं, त्याचा अनुभव आम्हाला आला. आम्ही बोलत असताना ते प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकून घेत होते आणि प्रतिसादही देत होते. सुरक्षेच्या कारणांमुळं आम्हाला फक्त पुस्तकाच्या फक्त तीनच प्रती आतमध्ये घेऊन जायची परवानगी मिळाली. आम्ही तिघांनीही तीनही पुस्तकांवर त्यांची स्वाक्षरी घेतल्यानं त्यांना देण्यासाठी पुस्तकच राहिलं नाही, हे आमच्या काही लक्षात आलं नाही...जाताना तेच म्हणाले, माझ्यासाठीही एक प्रत ठेवा, नंतर कुठे बाहेर ठेवलेली एक प्रत आम्ही त्यांना दिली. आमची भेट संपत आलेली असतानाच ते म्हणाले जाताना तुम्ही...हिरेन जोशींना भेटू घ्या. ते अशा सगळ्या गोष्टी बघत असतात. असं सांगत त्यांनी त्यांच्या सचिवांना बोलावून आमची भेट घालून देण्याची सूचना केली आणि आमचा मोर्चा साउथ ब्लॉककडे वळला.

साउथ ब्लॉक, नवी दिल्ली नवी दिल्लीतल्या विजय चौकातून राष्ट्रपती भवनाकडे जाताना डावीकडे साउथ ब्लॉक आण उजवीकडे नॉर्थ ब्लॉकच्या भव्य आणि देखण्या इमारती लागतात. परराष्ट्रमंत्रालय आणि राष्ट्रपती भवनाच्या मध्ये पंतप्रधानांचं कार्यालय आहे. भारताचं सगळ्यात मोठं शक्तिकेंद्र. सगळ्या देशाचा कारभार याच इमारतीतून चालतो. साउथ ब्लॉक हे भारताच्या पंतप्रधानांचं अधिकृत कार्यालय. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कार्यालयाला नवी झळाळी मिळाली. कारण नवी दिल्लीत असल्यावर त्यांचा सगळा कारभार याच इमारतीतून चालतो. पंतप्रधान कार्यालयातूनच फोन गेल्यानं साउथ ब्लाक मध्ये प्रवेशकरताना फारशी अडचण आली नाही. तपासणीचे सोपस्कार पार पडल्यावर आम्हाला एका वेटिंग रूम मध्ये बसवण्यात आलं. भव्य आणि प्रशस्त गोलाकार हॉलच होत तो, वर उंच गोलाकार घुमट, त्यावर जुन्या शैलीतलं आर्यकालीन संस्कृतीतलं भलं मोठं पेटिंग काढलं होतं. मुंबईचे चित्रकार एन.एच. नगरकर यांनी १९२८ मध्ये ते चित्र काढल्याचा उल्लेखही त्यावर होता. तिथं बसल्यावर मला पहिल्यांदा आठवण आली ती देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूंची नंतर काही क्षणातच नेहरूंपासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतचा एक पटच डोळ्यासमोरून गेला. गेल्या शंभर, दिडशे वर्षातल्या सगळया महत्वाच्या घटनांची साउथ ब्लाक साक्षीदार आहे. काही मिनीटांमध्येच आम्हाला डॉ. हिरेन जोशींच्या दुसऱ्या मजल्यावरच्या प्रशस्त कार्यालयात नेण्यात आलं. डॉ. जोशी हे पंतप्रधानांची वेबसाईट आणि सोशल मीडियाचं काम बघणाऱ्या गटाचे प्रमुख. सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असलेले आणि जगात सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश असल्यानं ते काम किती आव्हानात्मक असेल याची कल्पना करा. त्यांची सासूरवाडी महाराष्ट्रातली आहे त्यामुळं त्यांनाही थोडं मराठी कळतं अशी माहिती पंतप्रधानांनीच आम्हाला आधी दिली होती. पंतप्रधान कार्यालयाची मराठी वेबसाईट, त्यातला कंटेंन्ट, त्याची भाषा अशा अनेक गोष्टींवर ते बोलले. त्यांच्या अपेक्षाही सांगितल्या आमची मतंही विचारली. बोलण्यात कुठेही औपचारिकता, सरकारी स्टाईल किंवा तुटकपणा असं कुठेही जाणवला नाही. अशा मोठ्या क्षमतेचा माणूस या गटाचा प्रमुख असावा हेच पंतप्रधानांच्या सोशल मीडियावरच्या सक्रियतेचं खरं रहस्य आहे. थोडसं साउथ ब्लाक विषयी....ब्रिटिश वास्तुविशारद एडवीन ल्युटियन यानं नवी दिल्लीचा हा देखणा परिसर उभारला. यातल्या रायसिना हिल्सच्या एका टोकावर अतिशय भव्य आणि सुंदर असं राष्ट्रपती भवन (त्यावेळचं व्हिक्टोरिया हाऊस) आणि दोनही बाजुना लाल दगडांमध्ये बांधलेल्या साउश ब्लाक आणि नॉर्थ ब्लॉक या इमारती. दोनही ब्लॉक्समध्ये तब्बल १ हजार खोल्या.इथल्या मातीचा, वातावरणाचा, परिसराचा विचार करून 1911 मध्ये हा परिसर विकसित करण्यात आला. या भागतल्या दोन तृतीआंश भागात हिरवळ राहिल याची कटाक्षाणं काळजी घेतली गेली. तेव्हापासून हा परिसर भारताचं शक्तिस्थान राहिला आहे....जाता जाता...माणसांना आपलसं करण्याची विलक्षण हातोटी काही नेत्यांमध्ये असते. पंतप्रधान मोदी हे त्यात अव्वल आहे. त्यांच्यावर कडवी आणि प्रखर टीका होत असतानाही त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यांच्या या अफाट लोकप्रियतेचं कारण कदाचित हेच असावं...सामान्य नागरिकांना देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या नेत्याला भेटता येतं...त्याच्याशी बोलता येतं...ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची ताकद आहे आणि लोकशाहीचा विजयही....

- (लेखक आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत डेप्युटी एडिटर आहेत)