अहमदाबाद : भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह १४ जणांविरुद्ध समन्स जारी करण्याची मागणी माजी मंत्री आणि भाजपा नेत्या माया कोडनानी यांनी विशेष न्यायालयात एका अर्जाद्वारे केली आहे. गोध्रा दंगलीनंतरच्या २००२मधील नरोडा हत्याकांडातील प्रकरणात स्वत:चा बचाव करण्यासाठी कोडनानी यांनी हा अर्ज दाखल केला आहे. कोडनानी यांचे वकील अमित पटेल यांना न्यायालयाने विचारणा केली आहे की, या स्तरापर्यंत आल्यानंतर कशा प्रकारे ही याचिका प्रासंगिक आहे. या प्रकरणाची सुनावणी आता पुढील सोमवारी होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच कोडनानी यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. फौजदारी प्रक्रियेनुसार, या १४ जणांना कलम २३३ (३)नुसार समन्स जारी करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. सीआरपीसीच्या या कलमानुसार, एखादा आरोपी आणखी काही पुरावे, साक्ष, दस्तऐवज सादर करू इच्छित असेल तर, न्यायाधीश त्यासाठी परवानगी देऊ शकतात.
अमित शाहांसह १४ जणांविरुद्ध समन्स जारी करा
By admin | Updated: April 1, 2017 01:20 IST