शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ISRO Update : इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 08:16 IST

ISRO Update : भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं 17 जानेवारी शुक्रवारी पहाटे 2.35 मिनिटांनी GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

नवी दिल्लीः भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं 17 जानेवारी शुक्रवारी पहाटे 2.35 मिनिटांनी GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. फ्रान्समधील फ्रेंच गुएनास्थित कोरो द्वीपसमूहातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. उपग्रहाचं प्रक्षेपण झाल्यानंतर काही काळानंतर GSAT-30हून एरियन -5 VA251चा वरचा भाग यशस्वीरीत्या वेगळा झाला. इस्रोचं हे 2020मधलं पहिलं मिशन आहे. हा उपग्रह प्रक्षेपणानंतर 15 वर्षं काम करत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं असून, यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असल्यानं त्यातून ऊर्जा उत्पन्न होणार आहे.  इस्रोच्या माहितीनुसार GSAT-30 हा एक संचार उपग्रह आहे. तो इनसॅट-4ए सेटलाइटच्या जागेवर काम करणार आहे. इनसॅट सॅटेलाइट-4चं वय आता पूर्ण होत आलं आहे. त्यातच इंटरनेट टेक्नोलॉजीमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे जास्त शक्तिशाली उपग्रहाची गरज आहे. त्यासाठी इस्रोनं GSAT-30चं प्रक्षेपण केलं आहे.  GSAT-30 उपग्रह हा इनसॅट-4एची जागा घेणार आहे. इनसॅट-4एला वर्ष 2005मध्ये लाँच करण्यात आलं होतं. या उपग्रहामुळे भारताची दूरसंचार सेवा आणखी प्रभावी होणार असून, इंटरनेट स्पीडही वाढणार आहे. तसेच ज्या क्षेत्रात मोबाइल सेवा अद्याप पोहोचलेल्या नाहीत, तिकडेही पोहोचणं या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. 

व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेलिव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार असून, हवामान बदल आणि हवामानाचा अंदाज समजण्यासाठी हा उपग्रह मदतगार ठरणार आहे. यंदाच्या वर्षी भारतातल्या इस्रोकडून एकूण 10 उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. यात आदित्य-एल 1 उपग्रहाचाही समावेश आहे. या उपग्रहाला 2020पर्यंत प्रक्षेपित केलं जाईल. मिशन सूर्याचा अभ्यास करणारा हा पहिला भारतीय उपग्रह ठरणार आहे. 

टॅग्स :isroइस्रो