शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ISROची गगन भरारी, GSAT-6Aच्या यशस्वी प्रक्षेपणानं लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 21:28 IST

भारतानं अवकाश क्षेत्रात आणखी एक गगन भरारी घेतली आहे. स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं भारतानं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केलं आहे.

नवी दिल्ली- भारतानं अवकाश क्षेत्रात आणखी एक गगन भरारी घेतली आहे. स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं इस्रोनं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केलं आहे. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून GSAT-6A या उपग्रहानं संध्याकाळी 4.56च्या सुमारास GSLV रॉकेटमधून अवकाशात भरारी घेतली आहे.विशेष म्हणजे इस्रोच्या अभूतपूर्व यशामुळे लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार असून, संपर्काचं जाळ विस्तारण्यासाठी याची मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा इस्रोच्या या कामगिरीवर समाधान व्यक्त करत त्यांचं अभिनंदन केले आहे. GSAT-6A या उपग्रहामध्ये सर्वात मोठी संपर्काची यंत्रणा असल्यानं त्याचा दूरसंचार क्षेत्राला फायदा पोहोचणार आहे.GSAT-6Aमुळे अतिदुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या जवानांना दुस-या दूरच्या भागातील जवानांशी संपर्क साधणं सोपं होणार आहे. GSAT-6Aच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या जीएसएलव्हीत शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. या इंजिनाचा चांद्रयान-२ मोहिमेतही वापर केला जाण्याची शक्यता आहे. 2066 किलो वजनाचा हा उपग्रह बनवण्यासाठी 270 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. GSAT-6Aहा उपग्रह अवकाशात स्थिरावल्यानंतर त्यांचा संपर्कासाठी फायदा होणार आहे.  

टॅग्स :isroइस्रो