शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या 'या' उत्तराने जिंकली सर्वांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 14:49 IST

इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या एका उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

ठळक मुद्देइस्रो प्रमुख के. सिवन यांच्या एका उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत. 'सर्वात आधी मी एक भारतीय आहे' असे उत्तर दिले. मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नवी दिल्ली - 'चांद्रयान 2' मोहिमेतील शेवटचा टप्पा पार पडताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरापासून दूर असतानाच हा तुटला. मात्र, विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शास्त्रज्ञांना आशा कायम आहे. 'नासा' कडूनही 'इस्रो' चं कौतुक झालं आहे. त्यानंतर आता इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या एका उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

एका वृत्तवाहिनीने के. सिवन यांची मुलाखत घेतली. माध्यम प्रतिनिधीने सिवन यांना 'एका तमिळ व्यक्तीला येवढा मोठा सन्मान मिळाला, तेव्हा तुम्ही तमिळनाडूच्या जनतेला काय संदेश द्याल,' असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी 'सर्वात आधी मी एक भारतीय आहे' असे उत्तर दिले. या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

के. सिवन यांनी 'सर्वात आधी मी एक भारतीय आहे. एक भारतीय म्हणून इस्रोमध्ये आलो. इस्रो एक असं ठिकाण आहे जिथे सर्व भाषेचे आणि प्रांताचे लोक एकत्र काम करून आपलं योगदान देतात' असं उत्तर दिलं आहे. सिवन यांच्या उत्तरानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चांद्रयान -2 संदर्भात सोमवारी (9 सप्टेंबर) एक आनंदाची बातमी मिळाली. विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ आहे. त्याचं नुकसान झालेलं नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडं तिरकं आहे अशी माहिती चांद्रयान मिशनशी संबंधित असणाऱ्या इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

 

इस्रोच्या कामगिरीचं अनेक देश कौतुक करत आहेत. चीनच्या नागरिकांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे. तसेच हिंमत न हरता आपलं कार्य अशाच रितीने सुरू ठेवा असं म्हटलं आहे. चीनच्या सोशल मीडियावर भारताच्या चांद्रयान- 2 मोहिमेचं भरभरून कौतुक होत आहे. चीनची सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सने एका युजरला कोट करत भारतीय शास्त्रज्ञांनी उत्तम प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. तसेच कोणताही देश जर अंतराळातील संशोधनात प्रगती करत असेल तर त्याचा आम्ही सन्मान करतो. चांद्रयानाच्या अ‍ॅटिट्यूड कंट्रोल थ्रस्टरवरील (ACT) नियंत्रण न झाल्यानेच संपर्क तुटला असावा अशी शक्यता चीनमधील एका शास्त्रज्ञाने व्यक्त केल्याचं देखील ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.

इस्रोच्या अधिकाऱ्याने सोमवारी (9 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, 'विक्रमने हार्ड लँडिंग केलं आहे आणि ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार विक्रम नियोजित स्थळाजवळ आहे. विक्रम तुटलेलं नाही आणि ते सुरक्षित आहे.' इस्रोच्या आणखी एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर विक्रम लँडरचा एक जरी भाग निकामी झाला असेल तरी संपर्क साधणं कठीण होईल. पण आतापर्यंतची स्थिती चांगली आहे. चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर लँडर विक्रमशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित केला जाऊ शकतो. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरलं असलं, तरीही ते स्वत:च्या पायावर उभं राहू शकतं. इस्रोला विक्रमशी संपर्क साधण्यात यश आल्यास भारताच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल.

 

टॅग्स :K. Sivanके. सिवनChandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो