शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

विक्रम आणि प्रज्ञान जागे झाले नाही, तरी टेन्शन नाही...! ISRO ला अजूनही मोठी आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 21:58 IST

Chandrayaan-3 : भारताची चंद्रयान मोहीम आता संपुष्टात येणार आहे. कारण आणखी तीन-चार दिवसांनी चंद्रावरील शिव-शक्ती पॉइंटवर रात्र होणार आहे. याच बरोबर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा एकदा जागे होण्याची आशाही मावळणार आहे.

चंद्राच्या दक्षिण धृवावर झेंडा रोवून भारताने इतिहास रचला. भारताच्या चंद्रयान-3 ने अपेक्षेप्रमाणे काम केले आहे. एवढेच नाही, तर त्याने त्याच्या क्षमतेपेक्षाही अधिक काम करून दाखवले. भारताची चंद्रयान मोहीम आता संपुष्टात येणार आहे. कारण आणखी तीन-चार दिवसांनी चंद्रावरील शिव-शक्ती पॉइंटवर रात्र होणार आहे. याच बरोबर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा एकदा जागे होण्याची आशाही मावळणार आहे. मात्र, असे असले तरी, चंद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉडेलकडून आशा कायम आहे.

महत्वाचे म्हणजे, चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल गेल्या 58 दिवसांपासून सातत्याने चंद्राभोवती फिरत आहे. प्रोपल्शन मॉड्यूलने आतापर्यंत बराचसा डेटाही पाठवला आहे. या प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये एक उपकरण सेट केले आहे. SHAPE असे या  उपकरणाचे नाव आहे. याचा अर्थ आहे, स्पेक्ट्रो-पोलॅरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ. हे आकाशातील छोटे ग्रह शोधत आहे. याशिवाय एक्सोप्लॅनेट्सलाही शोधत आहे. एक्सोप्लॅनेट्सचा अर्थ सौर मंडळाबाहेरील ग्रहांचा शोध घेत आहे.

SHAPE चा उद्देश ग्रहांवरील जीवनासंदर्भात संकेत देणे अथवा मानवाला राहता येईल अशा ग्रहांचा शोधणे हा आहे. पोलोद सातत्याने या कामात व्यस्त आहे. डेटा पाठवत आहे. हे ग्रहांच्या शोधासाठी नियर-इंफ्रारेड (NIR) वेव्हलेन्थचा वापर करते. अर्थात, प्रोप्लशन मॉडेल चांद्रा भोवती फिरताना सुर्यमालेबाहेर असलेल्या ग्रहांचा शोध घेत आहे.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3