शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 21:33 IST

इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत. भारताने देखील ऑपरेशन सिंदूरनंतर या देशांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली होती.

इराणच्या अण्वस्त्र निर्मितीच्या कार्यक्रमावर इस्रायलने पहाटे हल्ले चढविले. यात इराणचे अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत. तसेच आर्मी चिफही मारले गेले आहेत. यामुळे इराणने अण्वस्त्र कार्यक्रमावरील अमेरिकेसोबतची चर्चा बंद करण्याचा निर्णय घेतला असून इस्त्रायलविरोधात युद्धाची तयारी सुरु केली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून परिस्थितीची माहिती दिली आहे. 

इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत. भारताने देखील ऑपरेशन सिंदूरनंतर या देशांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली होती. इस्रायल भारताचा शस्त्रास्त्र तंत्रज्ञान पुरवठादार देश आहे तर इराण हा भारताला इंधन पुरवितो. यामुळे भारत कोंडीत सापडला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यानंतर मोदींनी फोन केला होता. याची माहिती मोदींनी आपल्या एक्स अकाऊंटवर दिली आहे. 

मला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा फोन आला. त्यांनी मला सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. मी भारताच्या चिंता व्यक्त केल्या आणि या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला, असे मोदी म्हणाले आहेत. 

इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने इराणच्या अणु सुविधा, क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रे आणि लष्करी कमांडरना लक्ष्य केले. या हल्ल्यात तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलने या हल्ल्याला 'ऑपरेशन रायझिंग लायन'असे नाव दिले होते. या विरोधात आता इराणने प्रमुख मशीदीवर लाल निशान फडकाविले आहे. तसेच इराणचे प्रमुख खामेनेई यांनी याचा बदला घेण्यासाठी तयार रहा असे म्हटले आहे. इस्रायलने जगभरातील सर्व दुतावास तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा इराणला तातडीने करारावर सही करा नाहीतर इस्रायल खूप मोठे हल्ले सुरु करेल असे म्हटले आहे. 

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूNarendra Modiनरेंद्र मोदीIranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध