शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध; भारत सरकारने आतापर्यंत काय-काय केले? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 19:52 IST

पॅलिस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर युद्ध पेटले आहे.

Israel-Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Israel-Hamas War) यांच्यातला संघर्ष पुन्हा पेटला आहे. शनिवारी (दि.7) हमासने इस्रायलवर हजारो मिसाईल डागले, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. हमासला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने आपली लढाऊ विमानेही युद्धात उतरवली आहेत. दरम्यान, इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताकडून काय पावले उचलली गेली आहेत..?

इस्रायलवरील हल्ल्याची बातमी येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली. पीएम मोदींनी ट्विट करुन म्हटले की, इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. आमच्या भावना आणि प्रार्थना, या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.

दरम्यान, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनीही रविवारी म्हटले की, काल रात्री अचानक इस्रायलवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. पंतप्रधान कार्यालय या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्हीदेखील तेथील लोकांच्या संपर्कात आहोत. पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने तेथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारताने सर्व नागरिकांना सतर्क राहण्यास आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे. 

आपत्कालीन परिस्थितीत भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यासाठी भारताकडून +97235226748 हा क्रमांकही जारी करण्यात आला आहे. अॅडव्हायझरीमध्ये पुढे म्हटले की, दूतावासाचे कर्मचारी कोणत्याही मार्गदर्शनासाठी नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील. इंग्रजी तसेच हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये ही सूचना जारी करण्यात आली आहे.

एअर इंडियाने उड्डाण रद्द केलेशनिवारी इस्रायलने तेल अवीववर केलेल्या हल्ल्यानंतर एअर इंडियाने 14 ऑक्टोबरपर्यंत तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले की, प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेचा विचार करुन तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणे 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

हमासच्या हल्ल्यात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू इस्रायली मीडियाने सांगितल्यानुसार, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत किमान 250 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, इस्रायलच्या हल्ल्यात त्यांचे किमान 232 लोक ठार झाले आहेत आणि 1700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय