शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Israel-Hamas War : भारताचे 'ऑपरेशन अजय', इस्रायलहून दुसरे विमान २३५ भारतीयांना घेऊन दिल्लीला पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 08:17 IST

ऑपरेशन अजयद्वारे इस्रायलहून २३५ भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विमान दिल्लीला पोहोचले आहे.

ऑपरेशन अजय अंतर्गत, इस्रायलहून २३५ भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विमान दिल्ली विमानतळावर उतरले. इस्रायलमधून येणाऱ्या भारतीय नागरिकांचे स्वागत करण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह विमानतळावर उपस्थित होते. २३५ भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विमान इस्रायलच्या तेल अवीव येथून निघाले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

आधी गाझा, नंतर लेबनॉन आणि आता सीरियात बॉम्बफेक; इस्रायल-हमास युद्ध पश्चिम आशियात पसरले

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान, भारत आपल्या नागरिकांच्या मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन अजय' असे नाव देण्यात आले आहे. 

भारत सरकारने इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या १८ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. या अंतर्गत पहिले विशेष विमान गुरुवारी संध्याकाळी बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता २३० प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे. हे विमान शुक्रवारी सकाळी भारतात पोहचेल. या विमान प्रवासासाठी कोणतेही प्रवास शुल्क आकारण्यात येणार नाही. केंद्र सरकार हा सर्व खर्च उचलणार आहे.

तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने युद्धादरम्यान भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते भारतीय कंपन्यांसोबत ऑनलाइन बैठका घेत आहेत, ई-मेलद्वारे भारतातील विमानांची माहिती पाठवत आहेत, भारतीय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन देत आहेत आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत. 

येथे भारतीय परिचारिकांची संख्या सर्वाधिक आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले. इस्रायलने हमासपाठोपाठ सीरियावरही हल्ला केल्याने युद्धाचा भडका आणखी वाढण्याची भीती आहे. इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळांच्या रनवेचे नुकसान झाले आहे. हा हल्ला नेमका का केला याबाबत इस्रायलने माहिती दिलेली नाही.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIndiaभारत