शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

भीषण! इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये गाझा उद्ध्वस्त; UNRWA च्या 99 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 14:00 IST

Israel Palestine Conflict : 33 दिवसांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सुमारे 11 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 27 हजार लोक जखमी झाले आहेत.

इस्रायल आणि हमास गटामध्ये एक महिन्याहून अधिक दिवस भयंकर युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यांनी इस्रायली नागरिकांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली आणि 1400 लोकांना ठार केले. याशिवाय हमासच्या लोकांनी शेकडो इस्रायली नागरिक आणि परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले. इस्रायलमध्ये हमासने हल्ल्यानंतर लगेचच युद्ध घोषित करण्यात आलं आणि गाझा पट्टीवर वेगाने हवाई हल्ले सुरू केले. या 33 दिवसांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सुमारे 11 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 27 हजार लोक जखमी झाले आहेत. या काळात अनेक देशांनी युद्धविरामाची मागणीही केली, मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू याच्या बाजूने नाहीत. हमासचा नाश होईपर्यंत आपण थांबणार नाही, असे ते स्पष्टपणे सांगतात.

इस्रायलने हमासच्या वेपन आणि वॉर मशीन डिपार्टमेंटचा हेड महसन अबू-जिनाला बुधवारी (8 नोव्हेंबर) ठार केल्याचा दावा केला आहे. इस्रायल-हमास युद्धाविरोधात जगभरात निषेध आंदोलनेही सुरू आहेत. सीरियामध्ये असलेल्या इराणच्या वेपन स्टोरेजवर F15 फायटर जेटनी हल्ला करून सुमारे 9 जणांना ठार केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. 

यावर अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन म्हणाले की, अमेरिका आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी काहीही करेल. इराण समर्थित गटाने अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोनने हल्ला केला होता, ज्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने कारवाई केली. युद्धामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. 

IDF चे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी माहिती दिली की बुधवारी (8 नोव्हेंबर) अंदाजे 50,000 गाझाचे लोक उत्तरेकडील भागातून दक्षिणेकडे गेले आहेत. पॅलेस्टिनी निर्वासितांना समर्पित यूएन एजन्सीने सांगितले की 7 ऑक्टोबरपासून UNRWA  चे 99 कर्मचारी मारले गेले आहेत आणि किमान 26 जखमी झाले आहेत. युनायटेड नेशन्सच्या इतिहासातील कोणत्याही संघर्षात UN मदत कर्मचार्‍यांची ही सर्वाधिक संख्या आहे.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल