शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'भारताने इस्रायलला शस्त्रे देणे थांबवावे', राजनाथ सिंह यांना पत्र लिहून कोणी केली मागणी..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 13:58 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध अधिकच भीषण होत चालले आहे.

Israel Hamas War : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध अधिकच भीषण होत चालले आहे. इराणमध्ये राहणारा हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर इराणसह इतर देशही युद्धात सामील होण्याची शक्यता आहे. या युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम पडू शकतो, त्यामुळे भारत यावर लक्ष ठेवून आहे. अशातच, माजी न्यायाधीश, डिप्लोमॅट्स, कार्यकर्ते, लेखक आणि अर्थतज्ज्ञांसह देशातील 25 नागरिकांच्या गटाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना पत्र लिहून इस्रायलला शस्त्रास्त्रांची निर्यात थांबवण्याची विनंती केली आहे.

30 जुलै रोजीच्या या पत्रात पुढे म्हटले की, आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) ने स्पष्टपणे म्हटले आहे की, इस्रायल आपल्या दायित्वांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे, इस्रायलला शस्त्रे आणि युद्धसामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी विविध भारतीय कंपन्यांचे निर्यात परवाने रद्द करावेत. इस्रायलला कोणत्याही लष्करी सामग्रीचा पुरवठा करणे हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांतर्गत भारताच्या दायित्वांचे आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51(सी) सह अनुच्छेद 21 च्या आदेशाचे उल्लंघन आहे. आम्ही तुम्हाला निर्यात परवाने रद्द करण्याची विनंती करतो आणि इस्रायलला लष्करी उपकरणे पुरवणाऱ्या कंपन्यांना कोणतेही नवीन परवाने देणे थांबवावे, असे या पत्रात म्हटले आहे. 

अनेक भारतीय कंपन्यांचे इस्रायली कंपन्यांसोबत कामभारतातील अनेक सरकारी आणि खाजगी कंपन्या इस्रायली संरक्षण उत्पादन कंपन्यांसोबत शस्त्रे बनवण्यासाठी काम करत आहेत. या भारतीय कंपन्या त्यांच्या उत्पादनांचे अधिक भाग इस्रायली कंपन्यांसाठी तयार करतात. पत्रात तीन भारतीय कंपन्या, मुनिशन इंडिया लिमिटेड (एमआयएल), प्रीमियर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (पीईएल) आणि अदानी-एल्बिट ॲडव्हान्स्ड सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIndiaभारतRajnath Singhराजनाथ सिंह