शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"1 हजाराचं सिलेंडर अन् 200 रुपयांचं तेल घेऊन फुकटचं रेशन शिजवायची मजा औरच ना?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 12:37 IST

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला (PM Garib Kalyan Ann Yojana) पुढील ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. दुपारी साडेचार वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती.  शनिवारी ही बैठक कोणत्या उद्देशाने बोलावण्यात आली, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला (PM Garib Kalyan Ann Yojana) पुढील ६ महिन्यांसाठी वाढ देण्यात आली आहे. गरिबांसाठी हा निर्णय चांगला असला तरी दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधक केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत.  

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला (PM Garib Kalyan Ann Yojana) पुढील ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील, असा निर्णय मोदी मंत्रिमंडळात घेण्यात आला. तत्पूर्वी ही योजना ३१ मार्चला संपणार होती. मात्र, एकीकडे केंद्र सरकार या योजनेला सातत्याने मुदतवाढ देत आहे आणि दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, तेल, डाळ यांच्या किंमती भरमसाठ वाढत आहेत. त्यावरुनच, विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 

काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार अलका लांबा यांनी ट्विट करुन मोदी सरकारने दिलेल्या योजनेच्या मुतदवाढीवरुन टीका केली आहे. 90 रुपये लिटरचे पेट्रोल टाकून 1 हजार रुपयांचे सिलेंडर घेऊन घरी आल्यानंतर, 200 रुपये किलोचं तेल टाकून त्यावर मोफत धान्य योजनेतून अन्न शिजवून खायची मजा काही औरच असेल ना?, असा बोचरा सवाल लांबा यांनी विचारला आहे. लांबा ह्या सातत्याने सोशल मीडियातून केंद्र सरकारच्या धोरणांवर टिका करत असतात. 

सरकारनं कोरोना काळात सुरू केली होती ही योजना - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने ही योजना (PMGKAY) सुरू केली होती. यासाठी मोदी सरकारने १.७० कोटींची तरतूद केली होती. या अन्न योजनेंतर्गत गरिबांना प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य मिळत आले आहे. 

पेट्रोल-डिझेल दरवाढ

देशभरात गेल्या 2 महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये जराही दरवाढ झाली नव्हती. मात्र, निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 20 दिवसांतच पेट्रोलच्या दरात 3.50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या जीवनावर याचा मोठा परिणाम होत असून अन्नधान्य, दाळ, तेल यांच्याही किंमती वाढल्या आहेत. 

टॅग्स :InflationमहागाईPetrolपेट्रोलcongressकाँग्रेस