शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

"पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा निर्धार आहे का?"; अमित शाह यांचं पाकला धडकी भरवणारं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 15:04 IST

सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर व कलम ३७० वर सभागृहात चर्चा झाली.

नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय सैन्यांनी आपली ताकद दाखवून देत दहशतवाद्यांची ठिकाणं उध्वस्त केली होती. केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला धडकी भरवली. त्यामुळे, तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तणावाचे संबंध आहेत. दुसरीकडे भारताने कलम ३७० हटवून भारतासह पाकिस्तानलाही आश्चर्याचा धक्का दिला. आता, गेल्या काही दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा होत आहे.

सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर व कलम ३७० वर सभागृहात चर्चा झाली. जम्मू-काश्मीर पुनर्रचना आणि आरक्षण (दुरुस्ती) विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली. त्यावळी गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मी आणलेले विधेयक ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना न्याय आणि अधिकार देण्याशी संबंधित आहे. कोणत्याही समाजातील वंचितांना पुढे आणले पाहिजे, हा भारतीय राज्यघटनेचा मूळ आत्मा आहे. ७० वर्षांपासून दुर्लक्षित आणि अपमानित झालेल्या लोकांना न्याय देण्यासाठी जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक आणले आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. यावेळी, अमित शहांनी कलम ३७० चा उल्लेख करत पीओके आपलाच असल्याचं ठणकावून सांगितलं. त्यानंतर, आता पुन्हा एकदा अमित शहा यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत स्पष्ट विधान केलं आहे. 

अमित शहांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, पत्रकाराने त्यांना पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घेण्याचा तुमचा निर्धार आहे का?, असा सवाल केला होता. त्यावर, अमित शाह यांनी मजेशीर उत्तर दिले. मात्र, तेच मजेशीर उत्तर पाकिस्तानला धडकी भरवणारे ठरू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पत्रकाराच्या प्रश्नावर गृहमंत्री म्हणाले, मी मान्य करतो की पाकव्याप्त काश्मीरवर अनधिकृत ताबा आहे, पण POK हा भारताचा एक भाग आहे. तो ताब्यात घेण्याबाबत निर्धार केलाय हे तुम्हाला असं जाहीरपणे कार्यक्रमात सांगेल का? असे अमित शाह यांनी म्हटले. त्यावेळी, उपस्थितांनी हसून दाद दिली. अमित शाह यांची देहबोली आणि ते उत्तर ऐकून नक्कीच पाकिस्तानला धडकी भरली असेल, भारता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी कुठला प्लॅन तर आखत नाही ना, असा प्रश्न गृहमंत्र्यांच्या उत्तराने पाकिस्तानसह अनेकांना पडू शकतो.

लोकसभेत काय म्हणाले अमित शाहभारतीय निवडणूक आयोगाकडून काश्मीर विधानसभेत २ जागा काश्मिरी विस्थापितांसाठी नामांकीत केली जाईल. तसेच, पाकिस्तानने अनाधिकृतपणे ताबा घेतलेल्या आपल्या काश्मीरच्या प्रदेशातून एका व्यक्तीला नामांकीत केले जाणार आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा सभागृहात काही दिवसांपूर्वीच सांगितले. आम्ही ३ जागा वाढवून त्यास कायदेशीर संरक्षण देऊन विधेयकाच्या माध्यमातून आज हे सभागृहात ठेवले आहे, असेही ते म्हणाले. तसेच, जम्मूमध्ये यापूर्वी ३७ जागा होत्या, आता ४३ जागा झाल्या आहेत. तर, काश्मीरमध्ये यापूर्वी ४६ होत्या, आता ४७ झाल्या आहेत. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील २४ जागा आपण आरक्षित ठेवल्या आहेत, कारण पीओके आपलाच आहे, असे गृहमंत्र्यांनी लोकसभेत स्पष्ट केले होते. एकंदरीत जम्मू-काश्मीर विधानसभेत यापूर्वी १०७ जागा होत्या, आता ११४ झाल्या आहेत. तसेच, २ जागा नामांकीत केल्या जात, आता त्या ५ जागा नामांकीत केल्या जाणार असल्याचंही अमित शहांनी संसदेत चर्चेदरम्यान सांगितलं.  

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर