शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

वाचनीय लेख : महागाईचा एखादा उत्सव साजरा करता येईल का..?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 5:25 AM

 भाव वाढले की, आपण सतत खा-खा करत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हाच खातो.

अतुल कुलकर्णी

प्रिय नेताजी,

नमस्कार.

आपले अभिनंदन..! गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत... पेट्रोल-डिझेलही स्पर्धेत कुठेही मागे नाही... भाज्यांचे भाव वाढत आहेत... अन्नधान्याचे भाव चांगलेच वाढले आहेत... एवढं सगळं चांगलं चालू असताना त्या शेअर बाजारवाल्यांना काही कळत नाही का हो...? धपाधप त्यांचे भाव कोसळत आहेत... हे काही बरोबर नाही... त्यांचे भाव कसे वाढवता येतील यावर काहीतरी उपाय योजले पाहिजेत. सगळीकडे कसे चढे भाव पाहिजेत... शाळेचे ॲडमिशन चढ्या दराने... वह्या पुस्तकांच्या किमती चढ्या दराने... अन्नधान्यांच्या किमती चढ्या दराने... हे असं असलं की एकदम छान वातावरण तयार होतं... बाजार एकदम फुलून येतो. लोक वायफळ पैसे खर्च करत नाहीत. या जमेच्या बाजू कधी कोणी विचारातच घेतल्या नाहीत आजपर्यंत...!

आपल्याकडे पूर्वी नाही काय ''जागते रहो...'' अशी आरोळी देत रात्री गावागावात गस्त घालणारे येत असतं... तसंच आता दिवसाढवळ्या "भाव बजाते रहो..." असं म्हणायची वेळ आली आहे. भाववाढीचे फायदेदेखील या लोकांना कळत नाहीत. फार पूर्वी काही वर्षांपूर्वी आपले नेते गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन दरवाढीबद्दल ओरड करत होते. आता जमाना बदलला आहे. आपलं सरकार आहे. तेव्हा आपणच नरेटिव्ह सेट केले पाहिजे..! "भाववाढीचे फायदे" यावर आपल्या नेत्यांनी गावोगावी जाऊन भाषणं केली पाहिजेत. भाववाढीमुळे लोकांचा खर्च कमी होतो. म्हणजे बचत वाढते. बचत वाढली की चार पैसे गाठीला येतात. पुढे-मागे चुकून-माकून दवाखान्यात जावे लागले, तर चढ्या दराने हॉस्पिटलचे बिल देताना त्रास होत नाही.

 भाव वाढले की, आपण सतत खा-खा करत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हाच खातो. त्यामुळे तब्येत चांगली राहते. वजन वाढत नाही. वजन वाढले नाही, तर शरीर तंदुरुस्त राहते. हे सगळे फायदे आपण समजावून सांगितले पाहिजेत. जगात भाववाढ कशी होत आहे... त्या तुलनेने आपल्याकडे कशी कमी भाववाढ आहे... आपल्याला भाववाढीला अजून कसा स्कोप आहे... या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट समजावून सांगितल्या पाहिजेत. म्हणजे लोकांचे समज गैरसमज दूर होतील.

सिनेमाचे तिकीट कितीही महाग असलं तरी हे लोक घेतात ना...! त्यांच्या आवडीच्या हिरो-हिरॉईनला बघायला दोन-पाच हजार रुपये खर्च करून सिनेमाला जातातच ना. मग थोडेसे भाव वाढलेले पदार्थ घेतले तर बिघडलं कुठं..? कोथिंबिरीची जुडी महाग झाली तर लगेच केवढा गहजब करतात..? पण, गरज नसताना दोन-दोन साड्या, दोन-दोन ड्रेस घेतातच ना हे लोक...! त्यामुळे या लोकांना या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. उगाच आरडाओरड केल्याने भाव कमी होणार आहेत का..? युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, त्याचाही परिणाम भाववाढीवर होतो, हे सांगायला पाहिजे... शेवटी देशासाठी चार पैसे महागाच्या वस्तू घेतल्या तर बिघडलं कुठे...? गांधीजी तर खादीचे कपडे वापरा असं सांगायचे... स्वतः धोतर आणि पंचा घालायचे... आपण तर तसंही करायला सांगत नाही... मग खिशाला थोडी झळ पोहोचली तर बिघडलं कुठे...? हे आपण समजावून सांगितलं पाहिजे...

पुण्यामध्ये त्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी केवढा गोंधळ घातला महागाई वाढली म्हणून... आंदोलन केलं... या असल्या महागाईविरोधी आंदोलनांवर बंदीच आणली पाहिजे...! उगाच फुकटची प्रसिद्धी मिळते त्या लोकांना. आपण असं काही म्हणालो तर ते म्हणतात, तुम्ही कसे आंदोलन करत होता... ते दिवस वेगळे होते. तो जोश वेगळा होता. आता यांच्यासाठी ना ते दिवस परत येतील ना तो जोश परत येईल...! मग कशाला यांना फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी असली आंदोलन करू द्यायची...? अशा आंदोलनांच्या बातम्या महत्त्वाच्या आहेत की, राज ठाकरे यांना यूपी मधल्या ब्रजमोहनने सुनावले हे महत्त्वाचे आहे...? त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. 

भोंगे लावायचे की नाही..? कोण कुठला ब्रजमोहन आपल्या राज ठाकरेंना बोलतो हे कसे चुकीचे आहे...? हे मराठी माणसाला समजावून सांगितले पाहिजे. त्यामुळे दोन फायदे होतील. महाराष्ट्रातला युपी, बिहारी माणूस आपल्या बाजूने येईल आणि मराठी माणूस राजच्या बाजूला जाईल. परिणामी तरुणांनी वडापावच्या गाड्या टाकल्या पाहिजेत, असं म्हणणारा पक्ष, त्याच गाड्यावर वडापाव विकताना दिसेल...! कशी काय वाटली आयडिया..? काल काकांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनीच ही आयडिया दिली. असो, पुतण्याविषयी ते बरंच काही बोलले. ते सगळं पुढच्या पत्रात लिहीन... बाकी सगळे मजेत... काका म्हणत होते, महागाईचा एखादा उत्सव साजरा करता येतो का..? याचाही विचार करा...! धन्यवाद.आपलाच बाबूराव

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाई