इम्फाळ : मणिपुरातील सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांच्या उपोषणाचे १५ वे वर्ष सुरू झाले आहे़ शर्मिलांना पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थी, सिव्हिल सोसायटी संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी बुधवारी राज्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन, उपोषण, रॅलीचे आयोजन केले़ २ नोव्हेंबर २००० रोजी इम्फाळ विमानतळाजवळ आसाम रायफल्सच्या सुरक्षा जवानांसोबतच्या ‘चकमकीत’ १० नागरिक मारले गेले होते़ या घटनेनंतर इरोम शर्मिला राज्यातील वादग्रस्त आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅॅक्ट-१९५८ (सशस्त्र बल विशेष अधिकार अधिनियम-१९५८) अर्थात अफ्स्पा हटविण्याच्या मागणीसाठी ५ नोव्हेंबर २००० पासून उपोषणावर आहेत़ शर्मिला यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी अफ्स्पा हटविण्याची मागणी केली़ (वृत्तसंस्था)
इरोम शर्मिला यांच्या उपोषणाचे १५ वे वर्ष
By admin | Updated: November 7, 2014 04:23 IST