शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवर टॉयलेटला जाणं पडलं महागात; IRCTC ने जीएसटीसह वसूल केले 112 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 13:11 IST

Indian Railway : पर्यटकांना एक्झिक्युटिव्ह लाउंजचा वापर चांगलाच महागात पडला आणि जेव्हा हे प्रकरण लाउंज व्यवस्थापकापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांनी आयआरसीटीसीचा (IRCTC) कोणताही दोष नसल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : तुम्ही कधीतरी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडच्या टॉयलेटचा वापर केला असेल आणि त्यासाठी तुम्ही 5 ते 10 रुपये शुल्क देखील भरले असेल. मात्र, आता यासंबंधित एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, आग्रा कॅंट स्टेशनवरील एक्झिक्युटिव्ह लाउंजचे  टॉयलेट काही मिनिटांसाठी वापरण्याच्या बदल्यात, ब्रिटीश दूतावास नवी दिल्लीतून आलेल्या दोन पर्यटकांना 112-112 म्हणजेच 224 रुपये मोजावे लागले आहेत.

किती टक्के जीएसटी आकारला जातो 6 टक्के जीएसटी आणि 6 टक्के सी जीएसटी भरलेल्या रकमेत समावेश आहे. म्हणजेच टॉयलेटला जाण्यासाठी 12 टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. आत्तापर्यंतची ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये टॉयलेटमध्ये जाणे देखील एखाद्यासाठी इतके महाग असल्याचे समोर आले आहे.

आयआरसीटीसीने काय सांगितले?पर्यटकांना एक्झिक्युटिव्ह लाउंजचा वापर चांगलाच महागात पडला आणि जेव्हा हे प्रकरण लाउंज व्यवस्थापकापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांनी आयआरसीटीसीचा (IRCTC) कोणताही दोष नसल्याचे सांगितले. हे एक्झिक्युटिव्ह लाउंज आहे. एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये राहण्यासाठी 50 टक्के सूट दिल्यानंतर किमान 112 रुपये शुल्क भरणे बंधनकारक आहे. आयआरसीटीसीनुसार, पैसे भरल्यानंतर तुम्हाला लाउंजमध्ये कंप्लिमेंट्रिटी म्हणून कॉफी दिली जाते. यामध्ये तुम्ही  टॉयलेट वापरू शकता. मोफत वायफाय वापरू शकता. पेमेंट केल्यावर तुम्ही एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये 2 तासांपर्यंत राहू शकता.

याआधीही सेवा शुल्कामुळे चर्चेत आयआरसीटीसी आपल्या सेवा शुल्कामुळे पहिल्यांदाच चर्चेत नाही. यापूर्वी भोपाळ शताब्दी ट्रेनमध्ये 20 रुपयांच्या कपवर एका व्यक्तीकडून 50 रुपये सेवा शुल्क घेतले होते. त्या व्यक्तीला एका कप चहासाठी 70 रुपये मोजावे लागले. रेल्वेच्या या 'हायफाय' सेवेचा पुरावा म्हणून त्या व्यक्तीने चहाचे बिल सोशल मीडियावर शेअर केले होते, त्यानंतर रेल्वेला स्पष्टीकरण म्हणून आपले निवेदन जारी करावे लागले होते.

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वे