शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

इराण-लेबनॉन धमक्या देत राहिलं, इस्रायलनं हिजबुल्लाहची अनेक ठिकाणं केली उद्ध्वस्त, रात्रभर हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 14:32 IST

Iran Israel Conflict Updates : रात्रभर हल्ले करून दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहची अनेक ठिकाणं नष्ट करण्यात आल्याची माहिती आयडीएफनं दिली आहे.

Iran Israel Conflict Updates: इराणमध्ये हमासचा नेता इस्माईल हानियाच्या हत्येनंतर मध्य पूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणने इस्माईल हानियाच्या मृत्यूचा बदला इस्रायलकडून घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळं मध्य पूर्वेतील सतत तनाव वाढताना दिसून येत आहे. यादरम्यान, इस्रायली सैन्यानं (आयडीएफ) हिजबुल्लाच्या अनेक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. 

रात्रभर हल्ले करून दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहची अनेक ठिकाणं नष्ट करण्यात आल्याची माहिती आयडीएफनं दिली आहे. इराण आणि लेबनॉनच्या धमक्यांच्या दरम्यान हिजबुल्लाच्या ठिकाणांवर इस्रायलीनं हल्ला केला आहे. ३१ जुलै रोजी राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानिया यांच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या इराणनं इस्रायलला धडा शिकवण्याची धमकी दिली होती. त्यामुळं आता इराण कधीही युद्ध करु शकतं, असं म्हटलं जात होतं. 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही इराण आणि हिजबुल्लाहच्या या धमक्या पाहता हे देश इस्रायलवर कधीही हल्ला करू शकतात, असं म्हटले होतं. मात्र इराण आणि लेबनॉनच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून इस्रायलनं हिजबुल्लाचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. या धमक्या लक्षात घेऊन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं होतं की, इराण आणि त्यांचे समर्थक आपल्याला दहशतवादाच्या तावडीत अडकवू इच्छितात. त्यांच्या विरोधात प्रत्येक आघाडीवर आणि प्रत्येक क्षेत्रात, जवळ किंवा दूरवर उभे राहण्याचा आमचा निर्धार आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माईल हानिया यांच्या हत्येनंतर तणाव वाढला आहे. या घटनेच्या एक दिवस आधी लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हिजबुल्लाचा सर्वोच्च लष्करी कमांडर फऊद शुकरची हत्या करण्यात आली होती. हानिया हा गाझामधील हमासचा प्रमुख होता आणि इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी तो तेहरानला गेला होता.

दुसरीकडे, हिजबुल्लाहनेही इस्रायलला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. हिजबुल्लाहने गेल्या शनिवारी इस्रायलवर जवळपास ५० रॉकेट डागले होते. मात्र, इस्रायलच्या आयर्न डोमने हा हल्ला हाणून पाडला. इराण आणि हिजबुल्लाहने सूड उगवण्याच्या घोषणेमुळे मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर युद्ध भडकण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी तातडीची बैठक बोलावली होती. पुढील घटना टाळण्यासाठी पेंटागॉनने या भागात अतिरिक्त सैन्य दल तैनात करण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय