शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! लहानपणी वडिलांना गमावलं आता मजूर आईची मुलगी झाली IPS; वाचा दिव्याची 'यशस्वी' कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 20:02 IST

Success Story, IPS Divya Tanwar: आयपीएस दिव्या तन्वर यांनी मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. 

नवी दिल्ली : दरवर्षी लाखो उमेदवार UPSC ची परीक्षा देतात. यापैकी मोजकेच लोक यशस्वी होतात आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवतात. त्यांच्यापैकी काही असे देखील असतात जे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींना तोंड देत या यशाच्या शिखरावर पोहोचतात. 2021 बॅचच्या IPS दिव्या तन्वर यांची गणना अशाच अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. दिव्या तन्वर या हरयाणातील महेंद्रगड येथील रहिवासी आहेत.

त्यांच्या यशाची कहाणी UPSC ची परीक्षा देणाऱ्यांसाठी एक प्रेरणा आहे. खरं तर त्यांची आई कमी शिकलेली होती यात शंका नाही पण त्यांनी नेहमी आपल्या मुलीला अभ्यास करून पुढे जाण्याची प्रेरणा दिली. दिव्या यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोणतेही कोचिंग घेतले नव्हते. 

वडिलांच्या मृत्यूने बदललं जीवन IPS दिव्या तन्वर यांनी नवोदय विद्यालय महेंद्रगड येथून शालेय शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. शालेय शिक्षणादरम्यान वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला. दिव्या अभ्यासात हुशार होत्या आणि त्यामुळेच त्यांची आई बबिता तन्वर यांनी आपल्या मुलीच्या अभ्यासात कधीच अडथळा येऊ दिला नाही.

कॉलेजनंतर सुरू केली तयारीदिव्या यांच्या आईने दिव्या, तनिषा आणि साहिल या तिन्ही मुलांना शिवणकाम आणि मजुरी करून स्वत:च्या पायावर उभे केले. दिव्या यांनी बीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी घरातील एका छोट्या खोलीत 10 तास अभ्यास करून नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती.

पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यशIPS दिव्या तन्वर यांनी वयाच्या 21 व्या वर्षी (Youngest IPS Officer) 2021 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये त्यांनी 438 वा क्रमांक मिळवून त्या आयपीएस अधिकारी बनल्या. दिव्या यांच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांनाही माहिती नव्हते की त्या बंद खोलीत यूपीएससी परीक्षेची तयारी करत होत्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Haryanaहरयाणाupscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी