शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
4
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
5
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
6
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
7
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
8
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
9
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
10
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
11
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
12
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
13
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
14
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
15
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
16
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
18
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
19
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
20
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी

आयओटीएल कंपनीचा नाफ्ता चोरणार्‍या टोळीला अटक पाइपला छिद्र : राजकीय पदाधिकारी मुख्य सूत्रधार

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

नवी मुंबई : उरणमधील आयओटीएल कंपनीच्या भूमिगत पाइपमधून नाफ्ता चोरणार्‍या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लिटर नाफ्त्यासह ३६ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. कंपनीपासून ५०० मीटरवरच अनेक वर्षांपासून नाफ्ता चोरीचा हा प्रकार सुरू होता.

नवी मुंबई : उरणमधील आयओटीएल कंपनीच्या भूमिगत पाइपमधून नाफ्ता चोरणार्‍या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लिटर नाफ्त्यासह ३६ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. कंपनीपासून ५०० मीटरवरच अनेक वर्षांपासून नाफ्ता चोरीचा हा प्रकार सुरू होता.
चोरीचा नाफ्ता विकण्यासाठी महापे येथे एक टँकर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेली. त्यानुसार सापळा रचून विनयकुमार शर्मा (३६) याला ट्रेलरसह (एमएच- ०४, जीएफ-७०८९) अटक करण्यात आलेली. चौकशीत त्याच्याकडील ट्रेलरमध्ये २० हजार लिटर नाफ्ता आढळून आला. त्याने उरण येथून हा नाफ्ता आणल्याची कबुली पोलिसांना दिलेली. त्यानुसार उरण येथील घटनास्थळाच्या पाहणीत आयओटीएल (इंडियन ऑइल टँकिंग) कंपनीच्या भूमिगत पाइपला छिद्र पाडलेले होते, असे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. कंपनीपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर झाडीमध्ये जमिनीत दोन मीटर खोल खड्डा खोदून पाइपला छिद्र पाडून वॉल बसवण्यात आलेला. तर कोणाला संशय येऊ नये याकरिता कंटेनरमध्ये टँकर ठेवून त्यामध्ये नाफ्ता भरला जायचा. अनेक वर्षांपासून चाललेल्या या नाफ्ताचोरीच्या प्रकरणाची माहिती आयओटीएल कंपनीला देखील नव्हती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार उरणचा एक राजकीय पदाधिकारी असून कारवाईच्या भीतीने कुटुंबासह फरार झालेला आहे. पेट्रोल- डिझेलमध्ये भेसळीसाठी मोठ्या प्रमाणात नाफ्त्याचा वापर होत असतो. त्याकरिता ठिकठिकाणी या नाफ्त्याची विक्री केली जायची. उरण परिसरात यापूर्वीही नाफ्ताचोरीचे प्रकार उघड झालेले आहेत. अत्यंत ज्वालाग्राही असल्याने नाफ्त्याची उघड वाहतूक केली जात नाही. असे असतानाही ही टोळी नाफ्ता चोरी करून टँकरमधून संबंधितांना पुरवायची. मात्र नाफ्त्याच्या ठिकाणी अनपेक्षितपणे ठिणगी पडली असती तर स्फोटाने दीड किलोमीटरचा परिसर भस्मसात झाला असता, असे कंपनीने स्पष्ट केले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी सांगितले.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी गुन्हे उपआयुक्त मेंगडे, सहाय्यक आयुक्त रणजित धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारे यांनी सहाय्यक निरीक्षक सुभाष शिंदे, अजित शिंदे व हवालदार संजय कदम, नामदार किरण राऊत, अनिल यादव यांचे पथक तयार केलेले. या पथकाने शीघ्रगतीने तपास करून २० हजार लिटर नाफ्त्यासह टँकर, पाइप असा ३६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांना अटक केली. विनयकुमार शर्मा (३६), सुरज पांडे (३५), इम्तियाज अली चौधरी (५५), अन्वर खां, (५४), राजदेवजित सरोज (६२) आणि रामसमुज यादव (५२) अशी त्यांची नावे आहेत. तर मुख्य सूत्रधारासह इतर पाच जणांचा शोध सुरू असल्याचे उपआयुक्त मेंगडे यांनी सांगितले. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)