शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलऐवजी कारमध्ये डिझेल भरलं, प्रकरण पोहोचलं कोर्टात, दोन वर्षांनंतर मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:39 IST

हे प्रकरण तेलंगणातील वारंगल येथील असून ३० जुलै २०२२ रोजी घडलं होतं. 

हैदराबाद : पेट्रोल पंपावरील एक छोटीशी चूक तेल कंपनीला महागात पडली. दरम्यान, कारमध्येपेट्रोलऐवजी डिझेल भरण्यात आलं, त्यामुळं कारचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी जिल्हा ग्राहक न्यायालयानं इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला २६ हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितलं. हे प्रकरण तेलंगणातील वारंगल येथील असून ३० जुलै २०२२ रोजी घडलं होतं. 

याप्रकरणी मीनाक्षी नायडू नावाच्या महिलेनं इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ससी फ्यूल फिलिंग स्टेशन म्हणजेच पेट्रोल पंपचालकाविरोधात ही तक्रार केली होती. ३० जुलै २०२० रोजी ही महिला पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेली होती. TOI च्या रिपोर्टनुसार, तक्रारदार महिलेचं म्हणणे आहे की, तिनं पेट्रोल पंपावर असलेल्या व्यक्तीला १००० रुपयांचं पेट्रोल भरण्यास सांगितलं आणि तिनं डेबिट कार्डद्वारे पैसे दिले. 

महिलेचा आरोप आहे की, पेट्रोल भरल्यानंतर १० मिनिटांनी तिची कार सुरू होण्यास अडचण निर्माण झाली. यावेळी इंजिनमधून मोठा आवाज येऊ लागला आणि गाडी नीट चालत नव्हती. या महिलेनं मोठ्या कष्टानं कार चालवत हैदराबाद गाठलं. यानंतर महिलेनं कार अधिकृत सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठवली. या सेंटरमध्ये कार तपासणी केल्यानंतर पेट्रोलऐवजी कारमध्ये डिझेल भरल्यानं कारचं नुकसान झालं असून दुरुस्तीसाठी ६३८१ रुपये खर्च येणार असल्याचं सांगण्यात आलं. 

यानंतर महिलेनं पेट्रोल पंपचालकाविरोधात तक्रार दाखल केली. इंधनाच्या टाकीवर पेट्रोलचं स्टिकर असूनही त्यात डिझेल भरल्याचं महिलेनं सांगितलं. या प्रकरणात, पेट्रोल पंप व्यवस्थापनानं महिलेच्या आरोपांना उत्तर देताना सांगितलं की, जर त्यांच्यासोबत असं घडलं असेल तर त्यांनी त्वरित तक्रार करायला हवी होती. यानंतर हे प्रकरण जिल्हा ग्राहक न्यायालयात पोहोचलं. ग्राहक न्यायालयात प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायालयानं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला तक्रारदाराला या निष्काळजीपणाबद्दल २६,००० रुपये भरपाई देण्यास सांगितलं.

टॅग्स :Courtन्यायालयcarकारPetrolपेट्रोलJara hatkeजरा हटके