शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

होय, कार्ती चिदंबरमला लाच दिली होती; इंद्राणी मुखर्जी जबाबावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 09:30 IST

भायखळा कारागृहात एका खोलीत कार्तीला इंद्राणीसमोर बसविण्यात आले. त्यांची तब्बल चार तास चौकशी केली.

मुंबई: आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप असलेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सीबीआयच्या पथकाने रविवारी भायखळा कारागृहात आणलं होतं. सव्वाअकराच्या सुमारास भायखळा महिला कारागृहात नेण्यात आले. या ठिकाणी एका खोलीत कार्तीला इंद्राणीसमोर बसविण्यात आले. त्यांची तब्बल चार तास चौकशी केली. इंद्राणीने दिलेल्या माहितीवरून कार्तीकडे विचारणा करण्यात आली. आयएनएक्स प्रकरणी त्यांच्यामध्ये झालेली चर्चा, व्यवहाराच्या अनुषंगाने सुमारे चार तास प्रश्नोत्तरे झाली. त्यांच्या संभाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग घेण्यात आले. यावेळी कार्ती चिदंबरमला लाच दिल्याच्या आपल्या विधानावर इंद्राणी मुखर्जी कायम राहिली. कार्ती चिदंबरमने लाच मागितली होती आणि त्याला लाच देण्यात आली होती, या विधानावर इंद्राणी ठाम राहिली. तसंच कोर्टातही हाच जबाब देईल असं तिने म्हटल्याची माहिती आहे. चार तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास कार्तीला घेऊन सीबीआयचं पथक जेलमधून बाहेर पडले. या वेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी सीबीआय अधिका-यांकडे चौकशीबाबत विचारणा केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार देत ते विमानतळाच्या दिशेने निघून गेले. सायंकाळच्या विमानाने पथक दिल्लीकडे रवाना झाले.शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी गेल्या अडीच वर्षांपासून कारागृहात आहे. या प्रकरणाचा तपासही सीबीआय करीत आहे. 2007 मध्ये आयएनएक्स मीडियाला 300 कोटींची परकीय गुंतवणूक आणण्यासाठी कार्ती चिदंबरमने लाच मागितली होती. वडील अर्थमंत्री असल्याने तुमच्या कंपनीला फायदा करून चिदंबरमने लाच मागितली होती. वडील अर्थमंत्री असल्याने तुमच्या कंपनीला फायदा करून देऊ, असे कार्तीने आपल्याला सांगितले होते, असा जबाब तिने 17 फेब्रुवारीला  महानगर दंडाधिका-यांसमोर दिला आहे. त्यानंतर कार्तीविरुद्ध फास आवळून सीबीआयने चार दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरम