शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

INX MEDIA CASE : १ कोटी जमा करा अन् परदेशात जा!; कार्ति चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 22:17 IST

INX MEDIA CASE : सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये एक कोटी रुपये जमा केल्यानंतर कार्ति चिदंबरम यांना रिसतर परवानगी दिली जाणार आहे.

ठळक मुद्देकार्ति चिदंबरम यांना २५ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत परदेशी जाण्यासाठी सशर्त परवानगी सुप्रीम कोर्टानं दिली आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा आणि आयएनएक्स मीडिया प्रकरणातील आरोपी कार्ति चिदंबरम यांना २५ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत परदेशी जाण्यासाठी सशर्त परवानगी सुप्रीम कोर्टानं दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये एक कोटी रुपये जमा केल्यानंतर कार्ति चिदंबरम यांना रिसतर परवानगी दिली जाणार आहे.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टाला दिलेल्या माहितीनुसर, कार्ति चिदंबरम यांच्याकडून चौकशीत सहकार्य मिळालेलं नाही. त्याचप्रमाणे चौकशीसाठी जारी करण्यात आलेल्या नोटिसनंतरही ते हजर राहिलेले नाहीत. या बाबींवर निश्चितच विचार केला जाईल, असं यावेळी कोर्टानं नमूद केलं आहे.

कार्ति चिदंबरम यांच्याविरोधातील गुन्हेगारी प्रकरणात सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. चिदंबरम यांना सीबीआयने आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी २१ ऑगस्ट २०१९ रोजी अटक झाली होती, त्याच वर्षी १६ ऑक्टोबरला त्यांना ईडीने काळ्या पैशाच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर सहा दिवसांनी २२ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. सुप्रीम कोर्टाकडून हा सशर्त जामीन मंजूर केला होता. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं अन् देश सोडून जाऊ नये या अटीवर त्यांना जामीन मंजूर झाला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे पी. चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला होता. पी. चिदंबरम १७ ऑक्टोबरपासून ईडी कोठडीत होते. १०६ दिवसांपासून चिदंबरम तिहारमधील तुरुंगात होते. 

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरमP. Chidambaramपी. चिदंबरमSupreme Courtसर्वोच्च न्यायालयINX media caseआयएनएक्स मीडिया