रस्त्यावरील झुडुपे देताहेत अपघातांना निमंत्रण
By admin | Updated: May 6, 2014 16:46 IST
आगर: उगवा ते आगर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडुपांचे बन तयार झाले आहे. या झुडुपांमुळे वाहनचालकांना मोठी अडचण होत असून, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग ही झुडुपे तोडण्याची तसदी घेत नसल्याचे दिसत आहे.
रस्त्यावरील झुडुपे देताहेत अपघातांना निमंत्रण
आगर: उगवा ते आगर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडुपांचे बन तयार झाले आहे. या झुडुपांमुळे वाहनचालकांना मोठी अडचण होत असून, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग ही झुडुपे तोडण्याची तसदी घेत नसल्याचे दिसत आहे. आगर ते उगवा रस्त्यावर मोर्णा नदीच्या परिसरात दोन्ही बाजूंनी काटेरी झुडुपे आहेत. ही झुडुपे वाढून रस्त्यावर वाकल्यामुळे वाहनधारकांना त्यांना चुकवून मार्ग काढावा लागतो. अशावेळी वाहनात बसलेल्या प्रवाशांना काट्यांचे फटके बसून इजाही झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, वळणावर असलेल्या झुडुपांमुळे वाहनधारकांना विरुद्ध दिशेने येत असलेले वाहन व्यवस्थित दिसत नाही. या कारणामुळे दोन वाहनांची धडक होऊन मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात वृत्तपत्रातून वेळोवळी वृत्त प्रकाशित करण्यात आले तरी, संबंधित विभागाने त्याची दखल घेऊन झुडुपे तोडण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग येथे मोठा अपघात घडण्याची प्रतीक्षा, तर क रीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वळणावर वाढलेल्या झुडुपांमुळे दोन वर्षांपूर्वी दुचाकी आणि बसची धडक होऊन त्या अपघातात आगर येथील एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. हे उदाहरण डोळ्यांसमोर असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग या झुडुपांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून रस्त्यावरील झुडुपे तोडावी आणि अपघाताची भीती दूर करावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे. (वार्ताहर) फोटो:०७सीटीसीएल०३