शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी करा; प्रियांका गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 02:10 IST

उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी आंदोलकांवर झाली होती कारवाई

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्या व उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन काँग्रेस नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना सोमवारी सादर केले.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांना भरपाईसाठी पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. या आंदोलकांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून त्या रकमेतून भरपाई वसूल केली जाईल. या नोटीसांना स्थगिती द्यावी अशी मागणीही काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे.आंदोलनात मृत, जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करा -राहुल गांधीदेशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करताना ठार किंवा जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.पीडित कुटुंबियांची घेतली भेटआसाममधील निदर्शनांमध्ये बळी गेलेल्यांपैकी दोन जणांच्या कुटुंबियांची राहुल गांधी यांनी शनिवारी भेट घेतली होती. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करताना देशभरात अनेक युवक व युवती ठार किंवा जखमी झाले आहेत.त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना शक्य ती सर्व मदत काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावी. या आवाहनासोबतच राहुल गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील निदर्शनांचा एक व्हिडिओ टिष्ट्वटरवर झळकविला आहे.राहुल गांधी यांच्याप्रमाणेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही उत्तर प्रदेशातील आंदोलनात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करत आहेत.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPriyanka Gandhiप्रियंका गांधी