शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खासदार कपिल पाटील यांची मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 01:04 IST

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी विजय मिळवला आहे. पुढील पाच वर्षात मतदारसंघाच कोणत्या योजना राबवणार याबाबत पाटील साधलेला संवाद.

- पंढरीनाथ कुंभारभिवंडी - लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी विजय मिळवला आहे. पुढील पाच वर्षात मतदारसंघाच कोणत्या योजना राबवणार याबाबत पाटील साधलेला संवाद...विजयाचे श्रेय कोणाला देता?उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सतत पाठिंबा देऊन भरघोस निधी दिला. केवळ भिवंडी लोकसभा मतदारसंघात २८ हजार कोटींची कामे सुरू आहेत. त्यातून लोकसभा मतदारसंघाचा कायापालट होईल. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संघटनात्मक ताकदीबरोबरच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या सहकार्यामुळे विजय साकारला.पुढील पाच वर्षांत कोणती कामे करणार?भिवंडी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार उपचारासाठी एम्स रु ग्णालय, टेक्सटाइल पार्क, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प व कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, सर्व लोकल १५ डब्यांच्या करण्याबरोबरच लोकलच्या प्रवाशांना सुविधा मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.मेट्रोचा प्रश्न मार्गी लागणार का?ठाण्याच्या कापूरबावडीपर्यंत आलेली मेट्रो भिवंडीमार्गे कल्याणमध्ये नेण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यावर महिनाभरातच मुख्यमंत्री यांनी कार्यवाही करून मेट्रोला मंजुरी दिली होती. या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गी लागेल. त्याचबरोबर कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे कामही सुरू आहे.वस्त्रोेद्योगाचा प्रश्न मार्गी लागणार का?भिवंडीच्या वस्त्रोेद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्राने भिवंडीतूनच यंत्रमाग धोरणाची घोषणा केली होती. त्याचा अनेक जणांनी लाभ घेतला. सध्या यंत्रमागधारक विजेच्या जादा खर्चामुळे अडचणीत आहेत. त्यासाठी यंत्रमागधारकांना वीजपुरवठ्यात २७ एचपीऐवजी ५० एचपीपर्यंत अनुदान मिळविण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. भिवंडी स्मार्ट सिटी करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbhiwandi-pcभिवंडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९