शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

PNB Scam: मेहुल चोकसी अमेरिकेतून फरार, इंटरपोलची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 13:18 IST

रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या आधीच मेहुल चोकसी अमेरिका सोडून गेल्याचे समजते.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला(पीएनबी) 14 हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांना पडकण्यासाठी इंटरपोलकने रेड कॉर्नर नोटीस जारी केले आहे. मात्र, मेहुल चोकसी अमेरिकेतून सुद्धा फरार झाला आहे. रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या आधीच मेहुल चोकसी अमेरिका सोडून गेल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांपासून मेहुल चोकसी अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे, इंटरपोलच्या मदतीने त्याला भारतात आणता येईल , असे भारतीय तपास यंत्रणांना वाटत होते. मात्र, आता इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याआधीच मेहुल चोकसी अमेरिका सोडून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

पीएनबी घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआय आणि ईडीने नीरव मोदी, त्याचा मामा मेहुल चोकसी व त्यांचा एक विश्वासू कर्मचारी सुभाष परब यांच्याविरुद्ध फसवणूक, लबाडी, विश्वासघात आणि मनी लॉड्रिंगची आरोपपत्रे दाखल केली आहेत. त्याआधारे रेड कॉर्नर नोटीस  जारी करण्याची विनंती सीबीआयने इंटरपोल या जागतिक पोलीस संघटनेला केली होती. त्यानुसार नीरव मोदी, अशी नोटीस जारी करण्यात आली आहे.  

दरम्यान, जगभरातील 192 देश इंटरपोलचे सदस्य आहेत. नोटिशीत उल्लेख केलेली व्यक्ती कुढे आढळली तर तिला लगेच ताब्यात घेण्याची अथवा माहिती कळविण्याची विनंती त्या देशांना करण्यात आली आहे.

देश सोडून पळून गेलेले नीरव मोदीचे आठ जवळचे साथीदार1. सोनू शैलेष मेहता, ओराजेम कंपनी लिमिटेड2. भाविक जयेश शाह, ब्रिलियंट डायमंड लिमिटेड3. आशिष बजरंगलाल बागरिया, इटर्नल डायमंड्स कॉर्पोरेशन4. नीलेश वालजीभाई खेतानी, फॅन्सी क्रिएशन्स कंपनी लिमिटेड5. आशिष कुमार मोहनभाई लाड, सनशाइन जेम्स लिमिटेड6. ज्योती संदीप मिस्त्री, डीजी ब्रदर्स एफजेडई7. जिग्नेश किरण कुमार शाह, पॅसिफिक डायमंड एफजेडई8. संदीप भारत मिस्त्री, वर्ल्ड डायमंड डिस्ट्रीब्यूशन एफजेडई 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदी