पुरी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशासह जगभरातील विविध भागात योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी योगसाधना केली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिसामधील पुरीच्या समुद्रकिना-यावर जगातील पाच प्रमुख नेत्यांची प्रतिकृती साकारली असून एक योग संदेश दिला आहे.सुदर्शन पटनायक यांनी जगातील प्रमुख नेते योगासने करत असल्याची वाळूत प्रतिकृती साकारली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प , चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाळूत प्रतिकृती आहे. तसेच, सलोखा आणि शांतीसाठी योग,असा एक संदेश दिला आहे.
International Yoga Day 2018 : अद्भुत 'योग'... ट्रम्प, पुतिन, किम, जिनपिंग, मोदी या 'वजनदार' नेत्यांची एकत्र योगसाधना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 11:14 IST
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिसामधील पुरीच्या समुद्रकिना-यावर जगातील पाच प्रमुख नेत्यांची प्रतिकृती साकारली असून एक योग संदेश दिला आहे.
International Yoga Day 2018 : अद्भुत 'योग'... ट्रम्प, पुतिन, किम, जिनपिंग, मोदी या 'वजनदार' नेत्यांची एकत्र योगसाधना!
ठळक मुद्दे जगभरात ठिकठिकाणी आंतराष्ट्रीय योग दिन साजरा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी केली योगसाधनापाच प्रमुख नेत्यांची योग प्रतिकृती