शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड, 3 दहशतवाद्यांना अटक; ISI शी थेट संबंध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 15:24 IST

UP-MP-पंजाबमधून दहशतवादी अटकेत.

नवी दिल्ली : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांची देशभरात कारवाई सुरू आहे. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान प्रायोजित एका आंतरराष्ट्रीय आणि अंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड करत तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या संपूर्ण नेटवर्कचे संचालन पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शाहजाद भट्टी करत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भट्टी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI च्या निर्देशानुसार काम करतो, असे पोलिसांनी सांगितले.

UP-MP-पंजाबमधून दहशतवादी अटकेत

स्पेशल सेलच्या टायगर युनिटने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या मॉड्यूलवर छापा टाकला. एक आरोपी पंजाबातील गँगस्टर नेटवर्कशी जोडलेला असून तो शस्त्र आणि स्फोटक तस्करीत सक्रिय होता. इतर आरोपींना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून पकडले. पोलिसांच्या मते, सर्व आरोपी शाहजाद भट्टीच्या नेटवर्कअंतर्गत काम करत होते आणि हे संपूर्ण मॉड्यूल पाकिस्तानमधून चालवले जात होते.

दिल्ली-एनसीआरमध्ये हल्ल्याची योजना

चौकशीत उघड झाले की, हे दहशतवादी थेट पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते. सोशल मीडिया अकाऊंट्सद्वारे त्यांना ISI कडून स्फोटक हल्ल्यांचे आदेश मिळत होते. दिल्ली-एनसीआरमध्ये मोठा हल्ला करण्याची तयारी सुरू होती. पोलिसांना शंका आहे की, हे मॉड्यूल पंजाब, UP आणि MP मधील तरुणांची भर्ती करत होते.

पंजाबातील BJP नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला

शाहजाद भट्टीने काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये एका BJP नेत्याच्या घराबाहेर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. त्याचे नेटवर्क भारतातील कुख्यात बिश्नोई गँग आणि दहशतवादी संस्था बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) सोबत सक्रिय असल्याचे समोर आले आहे. यातील संघटना पूर्वी एकमेकींच्या विरोधात होत्या, मात्र ISI च्या दबावाखाली आता हे गट एकत्र येऊन हायब्रिड थ्रेट मॉड्यूल निर्माण करत आहेत.

स्पेशल सेलची मोठी उपलब्धी; 

पकडलेल्या आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. उत्तर भारतात सक्रिय असलेल्या या मॉड्यूलचा शोध लावणे ही स्पेशल सेलसाठी मोठी कामगिरी मानली जात आहे. आज सायंकाळी दिल्ली पोलिस मुख्यालयात अ‍ॅडिशनल CP (स्पेशल सेल) पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण ऑपरेशनची माहिती देतील.

English
हिंदी सारांश
Web Title : International Terror Module Busted, 3 Arrested; Direct ISI Links

Web Summary : Delhi Police busted an ISI-linked terror module, arresting three. The network, run by Shahzad Bhatti, planned attacks in Delhi-NCR. Arrests were made in UP, MP, and Punjab, revealing links to gangs and BKI.
टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादdelhiदिल्ली