शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

IMFने मोदी सरकारला दिली खूशखबर, यावर्षी ९.५ टक्के दराने अर्थव्यवस्था वाढणार, २०२२मध्ये भारत ग्रोथ रेटमध्ये संपूर्ण जगाला मागे टाकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 07:17 IST

Indian Economy News: एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाईचा भडका आणि कोळशाच्या टंचाईमुळे वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे.

वॉशिंग्टन - एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाईचा भडका आणि कोळशाच्या टंचाईमुळे वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे. मात्र दुसरीकडे या संकटांच्या मालिकांदरम्यान, आर्थिक आघाडीवरून मोदी सरकारसाठी खूशखबर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या नव्या अंदाजानुसार २०२१ मध्ये भारताचीअर्थव्यवस्था ही ९.५ टक्के आणि २०२२ मध्ये ८.५ टक्के दराने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७.३ टक्क्यांनी घटला होता. आयएमएफच्या नव्या आर्थिक चित्रामध्ये भारताच्या विकासाच्या अंदाजाला यावर्षी जुलैमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपल्या आधीच्या अंदाजावर स्थिर ठेवण्यात आले आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या तुलनेत हा अंदाज १.६ टक्क्यांनी कमी आहे. आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी नव्या डब्ल्यूईओनुसार २०२१ मध्ये संपूर्ण जगाचा विकास दर हा ५.९ टक्के तर २०२२ मध्ये ४.९ टक्के राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा यावर्षीचा विकास दर सहा टक्के आणि पुढील वर्षातील विकासदर ५.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. या पूर्वानुमानांनुसार चीनची अर्थव्यवस्ता २०२१ मध्ये आठ टक्के आणि २०२२ मध्ये ५.६ टक्के दराने वाढू शकते. आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले की, त्यांच्या जुलै महिन्यामधील अंदाजाच्या तुलनेमध्ये २०२१च्या जागतिक वृद्धीच्या अनुमानाला किंचित स्वरूपात संशोधित करून ५.९ टक्के करण्यात आले आहे. तसेच २०२२मध्ये ते ४.९ टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था