India Pakistan Tension: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला करून आपल्या नापाक कारवायांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) एक अब्ज डॉलरचं नवं कर्ज मिळाल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. यानंतर शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Piyanka Chaturvedi) यांनी आयएमएफला टेरर फंडिंग संस्था म्हटलंय.
काय म्हणाल्या चतुर्वेदी?
प्रियांका चतुर्वेदी यांनी आयएमएफकडून पाकिस्तानला मिळालेल्या निधीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. "इंटरनॅशनल मोनेटरी फंडचं नाव बदलून इंटरनॅशनल टेररिस्ट फंड करण्यात यावं," असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. आयएमएफ एक दहशतवादी जगभरात एक्सपोर्ट करण्यासाठी आणि अधिक दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी आर्थिक मदत करत आहे आणि हे नींदनीय आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
पाकिस्तानी ड्रोन्स निष्क्रिय केले
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष शुक्रवार-शनिवारच्या रात्री टोकाला पोहोचला. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी अंधार होताच हवाई हल्ले करत नुकसान करण्याचे प्रयत्न केले. पण, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन्स आणि मिसाईल्स हल्ले हवेतच निष्क्रिय केले. पाकिस्तानकडून भारतातील तब्बल २६ ठिकाणांना लक्ष्य केल्यानंतर भारतीय लष्करानंजशास तसं उत्तर दिलं. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं शक्तिशाली फतेह १ मिसाईल डागल्यानंतर भारतानं बॅलेस्टिक मिसाईल्सनं उत्तर दिलं. यामुळे पाकिस्तानातील अनेक ठिकाणी मोठे स्फोट झाले. पाकिस्तानकडून असा दावा करण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून ८-९ मेच्या रात्री ड्रोन्स आणि मिसाईल्स डागण्यात आल्या. पाकिस्तानचे हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडण्यात आले. त्यामुळे पाकिस्तान पिसाळला. ९ आणि १० मे रोजीच्या रात्री पाकिस्तानकडून तब्बल चार राज्यातील २६ ठिकाणी हल्ल्याचे प्रयत्न झाले.